नवी दिल्ली : विराट कोहली जसा आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे तो त्याच्या शरीरावरील टॅटूसाठीही चर्चेत असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जे आपल्या शरीरावर टॅटू काढत नाहीत तेदेखील मॅच जिंकू शकतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी माजी कॅप्टन राहुल द्रविडने केले.साहजिकच त्याचा निशाणा तेव्हा विराट कोहलीवर होता.


विराट कोहलीच्या डाव्या बाजूला तीन मोठे टॅटू आहेत. यामध्ये जपानी समुराई योद्ध्याचा टॅटू सर्वांचे लक्ष वेधून घेतो. या जपानी सैनिकाच्या हातात तलवार आहे. विराट या टॅटूला आपला गुडलक मानतो.
 
याशिवाय दुसऱ्या बाजूला शांतता आणि शक्तीचे प्रतीक गोंदविले आहे. विराट हा भगवान शिव यांचा भक्त आहे. त्याच्या डाव्या हाताने भगवान शिव  यांचा टॅटू आहे. तसेच एका बाजूस आपल्या आई वडिलांचे नाव त्याने हिंदी भाषेत त्याने गोंदविले आहे. 


नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी त्याने ओमचा टॅटू बनविला आहे. विराटच्या उजव्या बाजूस त्याने त्याच्या विंचूचा (वृश्चिक) टॅटू गोंदला आहे. याशिवाय, त्याने एक चीनी प्रतीक तयार केले आहे, जो विश्वासाचे प्रतिक मानले जाते.