मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली. विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन्स काढत आहे. पण विराट कोहली ज्या बॅटनं रन्सचा डोंगर उभारतो त्या बॅटची किंमत तुम्हाला माहिती आहे का?...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली सध्या वापरत असलेल्या या बॅटची किंमत आहे तब्बल २० हजार रुपये. क्रिकविझ या वेबसाईटनं कोहली वापरत असलेल्या या बॅटची किंमत सांगितली आहे.


असं काय आहे विराटच्या बॅटमध्ये?


विराट कोहली हा सध्या ग्रेड ए इंग्लिश विलो असलेली कर्व्ह्ड बॅट वापरत आहे. कोणतीही बॅटही तिच्यावर असलेल्या रेषांवर ठरवली जाते. बॅटवर जेवढ्या जास्त रेषा असतात तेवढी ती बॅट चांगली असते. जास्त रेषा असलेल्या बॅटमुळे फटका जास्त जोरात बसतो. ६ ते १२ रेषा असलेली बॅट ही चांगल्या दर्जाची बॅट समजली जाते. विराट कोहलीच्या बॅटमध्ये ८ ते १२ रेषा आहेत. याची बाजारातली किंमत १७ हजार ते २३ हजार रुपये आहे.