मुंबई : महिला क्रिकेट विश्व कपच्या सेमीफायनलच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारी हरमनप्रीत कौर (१७१) रोम्यांटीक सिनेमा पाहण्याला जास्त पसंती देत आहे. तिचा सर्वाधिक आवडता सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'. हा सिनेमा तिने अनेकवेळा पाहिला आहे. हा हिट झालेला सिनेमा अभिनेता शाहरुख खानचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीत कौरचा जन्म ८ मार्च १९८९चा असून पंजाबमधील मोगामध्ये झालाय. ती क्रिकेट शिवाय सिनेमा पाहिणे, गाणी ऐकणे आणि कार चालविण्यावर भर देते. तिने पहिला क्रिकेट सामना २००९ मध्ये खेळला आहे. ती वीरेंद्र सेहवागला आपला आदर्श मानते. ती बॉल देखो, हिट करो, हा वीरेंद्रचा फॉर्म्युला ती वापरत आलेय.


हरमनप्रीत कौरने २०१३मध्ये विश्व चषक स्पर्धेत इंग्लंडच्या विरुद्ध शतक ठोकले होते. त्यामुळे आताही ही संधी पुन्हा तिच्या वाट्याला आलेय. २३ जुलैला इंग्लंडविरुध्द अंतिम सामना होत आहे.


तिने ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये चमक दाखविलेय. ती तीन तीन कॉस्ट्रॅक्ट करणारी पहिला भारतीय महिला होय. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताकडून खेळताना तिने टी-२० क्रिकेटमध्ये संघाला मोठे यश मिळवून दिले.