नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर आज भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली वनडे खेळणार आहे. भारतीय संघ सव्वा वर्षानंतर प्रशिक्षकाशिवाय सामना खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. विराट-कुंबळे वादाच्या पार्श्वभूमीवर हा सामना होतोय. भारतीय संघ इंग्लंडमधून थेट वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दाखल झाला. 


आज भारतीय संघाने सामन्यापूर्वी चांगलाच सराव केला. यादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंनी जुन्या मित्रांची भेट घेतली. ड्वायेन आणि डॅरेन ब्राव्हो भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाहीयेत. मात्र त्यानंतरही ते मैदानावर आपल्या भारतीय मित्रांना भेटायला आले होते. 


बीसीसीआयने याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. यात ब्रावो बंधूसह भारतीय संघातील महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या मस्ती करताना दिसतायत.