Virat Kohli Century : मुंबईतील वानखेडे मैदानावर बुधवारी क्रिकेटप्रेमींसोबत बॉलिवूड असो किंवा क्रिकेट विश्वातील नावाजलेले लोक त्यांच्या स्मरणात राहिलं असा क्षण प्रत्येकाने अनुभवला. किंग कोहलीने वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामन्यात वनडे क्रिकेटमधील 50 वं शतक Virat Kohli 50th Century) ठोकलं. एवढंच नाही तर हे शतक ठोकत त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड मोडला. (When I saw you in the dressing room for the first time Sachin s special post for Virat who broke the historic record and Virat Kohli 50th Century at world cup 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतकं झळकावली होती. तर कोहलीने 279व्या डावात 50 शतकं झळकावली असून त्याने हा इतिहास रचला आहे. कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची खेळी करुन भारतीयांना भाऊबीज गिफ्ट दिलं आहे. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले आहेत. पण त्यानंतर कोहलीला सौदीने कॉनवेच्या हाती झेलबाद झाला. 


'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...'


आपल्या क्रिकेटचा देव आणि गुरु सचिन तेंडुलकरसमोर विराटने इतिहास रचत आहे. या क्षणानंतर सचिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सचिन तेंडुलकरचा 20 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड या किंगने मोडला आहे. 


सचिनची खास पोस्ट !


''जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो तेव्हा तू माझ्या पाया पडला, तेव्हा इतर संघ सहकाऱ्यांनी तुझी थट्टा केली होती. त्या दिवशी मला हसू आवरता आलं नव्हतं. पण लवकरच, तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलाय. आता मला खूप आनंद झाला आहे, तरुण मुलगा आज 'विराट' खेळाडू झाला आहे. 



''एका भारतीयाने माझा विक्रम मोडला याचा मला खूप जास्त आनंद आहे आणि तेही सर्वात मोठ्या स्टेजवर विश्वचषक उपांत्य फेरीत तू ही कमाल केली आहे. माझ्या घरच्या मैदानावर जणू काही केकवर आयसिंगचा अनुभव आज तू मला दिला आहे.''