मुंबई : टीम इंडिया भिंत मानला जाणारा महान खेळाडू राहुल द्रविड याचा आज वाढदिवस. आज त्याच्या अनेक गाजलेल्या आणि लक्षात राहिलेल्या खेळींची आठवण केली जात आहे. राहुल द्रविड अतिशय शांत आणि गंभीर स्वभावाचा होता. तुम्ही कधीही कोणत्याही वादात त्याला पाहिले नसेल. काहीही झालं तरी द्रविड त्याच्या एका शैलीत खेळताना दिसत होता. 


तो यादगार किस्सा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचा असाच एक खास किस्साअ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका सामन्यात राहुल द्रविड खातं उघडण्यात इतका वेळ लावला की, मैदानातील प्रेक्षकच हैराण झाले होते. हा क्षण राहुल द्रविडने कसा हॅन्डल केला होता हे तुम्हीच बघा. 


आणि त्याने रन काढला


झालं असं होतं की, इंग्लंड विरूद्ध एका सामन्यात द्रविडला रन काढण्यात खूप अडचण होत होती. द्रविड इतका संघर्ष करत होता की, ४० बॉल्स खेळूनही त्याने एकही रन काढला नव्हता. त्यामुळे प्रेक्षक त्याच्यावर फनी कमेंट्स करत होते. अशातही दबावात न येता त्याने खेळ सुरू ठेवला. अखेर ४१व्या बॉलवर त्याने एक रन काढला. यावर प्रेक्षकांना हसत टाळ्या वाजवल्या. 


राहुलचा मजाकिया अंदाज


एक रन काढल्यावर वातावरण असं तयार झालं होतं की, जणू राहुल द्रविडने शतक ठोकलं असेल. काही फॅन्स जागेवरून उठून द्रविडचं अभिनंदन करत होते. पण द्रविडने परिस्थीती आणि आपल्यावरील दबाव समजून ही घटना गंमतीने घेतली. आणि गंमतीने प्रेक्षकांना उत्तरही दिले. बहुदा यामुळे राहुल द्रविड सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो. त्याचा असा हा अंदाज याआधी आणि नंतर कुणीही पाहिला नसेल. 


राहुलने असे दिले उत्तर


प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि राहुलनेही गंमतीने बॅट हवेत उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्विकारलं. त्याने केवळ एकच रन केला होता. राहुलचा हा अंदाज पाहून प्रेक्षक आणखीनच जोरात टाळ्या वाजवू लागले होते. 



राहुल द्रविडचं करिअर


द्रविडने ३४४ वनडे सामन्यांमध्ये नाबाद राहत ७१.२४ च्या स्ट्राईक रेटने १०८८९ रन्स केलेत. यात द्रविड १२ शतकं आणि ८३ अर्धशतकं लगावले. तर द्रविडने १६४ टेस्ट सामन्यांमधील २८६ खेळींमध्ये ३२८८ रन्स केलेत. आश्चर्यजनक बाब म्हणजे द्रविड वनडे सामन्यांमध्ये ५७ वेळा आणि टेस्टमध्ये ५२ वेळा बोल्ड झाला होता.