नवी दिल्ली : टीम इंडियाचा 'हिटमॅन' अर्थात रोहित शर्मा याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. श्रीलंकेविरोधात रोहित शर्माने खेळलेली तुफानी इनिंग सर्वांच्याच लक्षात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात खेळलेल्या टी-२० मॅचमध्ये अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. रोहित शर्माची ही आक्रमक बॅटिंग पाहून सर्वच क्रीडाप्रेमी त्याच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, याच रोहित शर्मावर एकेदिवशी जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. पाहूयात काय आहे हा प्रकार...


श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचपूर्वी निवेदक गौरव कपूर याने आपला 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' हा एपिसोड रिलीज केला. या एपिसोडमध्ये रोहित शर्माने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाला दिला आहे. 


रोहित शर्माने सांगितले की, लहानपणी आम्ही सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळत होतो. एकेदिवशी मी बॅटिंग करत असताना बॉल थेट शेजारच्यांच्या खिडकीला लागला आणि त्यांची काच फुटली. असा प्रकार अनेकदा घडला होता. त्यामुळे वैतागलेल्या शेजारच्यांनी आमची तक्रार थेट पोलिसांतच केली. 


पोलिसांत तक्रार केल्यानंतर सोसायटीत पोलीस दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मला सज्जड दम भरला आणि म्हटलं, पुन्हा तुझी तक्रार आली तर तुला जेलमध्ये टाकू.


रोहित शर्माचं हिंदी लहानपणापासूनच काही खास नाहीये. रोहितला इंग्रजीच्या तुलनेत हिंदी खूपच कठीण वाटते. मात्र, आता रोहितने आपल्या हिंदीत खूपच सुधारणा केली आहे. रोहितची पत्नी रितिका त्याच्या तुलनेत खूपच चांगली हिंदी बोलते.