मुंबई : हार्दिक पांड्याला किरेन पोलार्डने अटक करण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्हीही हैराण झालात ना? मात्र हे खरं आहे. याचा खुलासा भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा टीम इंडिया वेस्ट इडिंजच्या दौऱ्यावर गेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. यावेळी टीम इंडियाच्या या ऑलराऊंडर क्रिकेटरसोबत ही घटना घडली होती. याचा खुलासा हार्दिक पांड्याने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमादरम्यान केला.


हार्दिकने शेअर केला किस्सा


दरम्यान, हा किस्सा मजेत घडला होता. हार्दिक म्हणाला, जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली होती तेव्हा पोलार्डचे माझ्याशी खास नाते झाले होते. त्यामुळेच पांड्याला त्याला दुसरा भाऊ म्हणतो. पोलार्डने आपल्या शहरात माझी सगळ्यांशी भेट घडवून दिली. मी प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत गेलो. या दरम्यान आमच्यात चांगले नाते निर्माण झाले. म्हणूनच मी त्याला भाऊ मानतो, असे पांड्याने सांगितले. 


काय घडलं नेमक?


एकदा तर पोलार्डने त्याला जवळ जवळ अटकच कली होती. दरम्यान हे मजेत घडले होते मात्र पांड्याचे हृदयाचे ठोके मात्र वाढले. पोलार्डने त्याची चांगलीच मस्करी केली. त्याने पोलिसांना बोलवले आणि अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा पोलीस पोलार्डचा मित्र होता हे पांड्याला माहीत नव्हते. त्यामुळे या दोघांनी मिळून पांड्याला घाबरवले.


या दरम्यान आपल्याशी मस्करी केली जात असल्याचे पांड्याने ओळखले. पांड्या म्हणाला, मी विचार केला की संघाला बोलवून घेईन आणि प्रकरण मिटवेन. मात्र जेव्हा पोलार्डचा पोलीस मित्र फोन उल्टा घेऊन कोणाशीतरी बोलतोय हे कळलं तेव्हा आपली मस्करी सुरु असल्याचे माझ्या लक्षात आले, असे पांड्या म्हणाला.