IPL 2025: क्रिकेट विश्वातील सगळ्यात प्रसिद्ध स्पर्धा म्हणजे आएपीएल. आता अखेरीस बीसीसीआय (BCCI) ने आएपीएल 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना ही माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, खेळाडूंचा लिलाव सलग दुसऱ्यांदा परदेशात होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 24 आणि 25 नोव्हेंबर हे दिवस निवडले आहेत. सौदी अरेबियामधील जेद्दाह या ठिकाणची यंदा निवड करण्यात आली आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.


किती भारतीय खेळाडू आहेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नोंदणीकृत खेळाडूंपैकी 1165 भारतीय आहेत. उर्वरित 409 विदेशी खेळाडू आहेत. यावेळच्या लिलावासाठी दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक 91 आणि ऑस्ट्रेलियातील 76 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.


फ्रँचायझीचे मालक कुठे राहतील?


आयपीएल लिलावासाठी जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिनाची निवड करण्यात आली आहे. यासोबतच हॉटेल शांग्री-लाला येथे  सर्व संघांचे मालक आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी बीसीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. हॉटेल शांग्री-ला हॉटेल हे लिलाव ठिकाणाजवळ आहे.



कोणत्या देशाचे किती खेळाडू आहेत?


48 भारतीय खेळाडूंसह, 272 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी लिलावात आपली नावे नोंदवली आहेत. लिलावासाठी सर्वाधिक अर्ज दक्षिण आफ्रिकेतील आहेत. दक्षिण आफ्रिकेचे 91, ऑस्ट्रेलियाचे 76, इंग्लंडचे 52, न्यूझीलंडचे 39, श्रीलंकेचे 29, अफगाणिस्तानचे 29 आणि वेस्ट इंडिजचे 33 खेळाडू या लिलावात सहभागी झाले आहेत.


सर्वात मोठी पर्स कोणाची?


या लिलावात पंजाब किंग्जची सर्वात मोठी पर्स आहे. पंजाबने केवळ दोन भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यानंतर संघ तयार करण्यासाठी त्याच्याकडे 110.5 कोटी रुपये असतील. तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात लहान पर्स आहे. राजस्थानने सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता त्याच्याकडे फक्त 41 कोटी रुपयांची पर्स असेल.


किती खेळाडू खरेदी केले जातील?


31 ऑक्टोबर रोजी, रिटेन्शनची  यादी सबमिट करण्याची अंतिम तारीख होती. ही यादी सर्व संघांनी जाहीर केली आहे. त्यानंतर सर्व दहा संघ मिळून लिलावात 204 स्लॉट (70 परदेशी) भरू शकतील. प्रत्येक फ्रँचायझी आपल्या संघासाठी जास्तीत जास्त 25 खेळाडू खरेदी करू शकते. त्यामुळे खेळाडूंची संख्या किमान 18 असणे बंधनकारक आहे.