दिल्ली : मैदानावर घडलेल्या दुर्देवी घटनांबद्दल यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल. अशीच एक घटना फुटबॉलच्या ग्राऊंडवर घडली आहे. अल्जीरियामध्ये फुटबॉलच्या मैदानावर ही दुर्देवी घटना घडली आहे. यावेळी फुटबॉलपटूचा हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. 


अशी घडली दुर्घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लीग-2 ही स्पर्धा अल्जेरियात खेळवली जात होती. ज्यामध्ये शनिवारी Mouloudia Saida आणि ASM Oran क्लब यांच्यात सामना झाला. यादरम्यान सोफियाने लॉकर त्याच्याच टीमच्या गोलकीपरशी टक्कर झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला, मात्र काही वेळातच पुन्हा खेळण्यासाठी मैदानात परतला. 


जेव्हा अल्जेरियाची फुटबॉलपटू सोफियाने लॉकर मैदानावर खेळायला आला आणि 10 मिनिटांनंतर तो अचानक कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लॉकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येतंय. 



सोफियाने लॉकरचे अवघ्या 28 वर्षांचा होता. तो मौलौदिया सैदाचा खेळाडू होता आणि त्याच्या टीमचा कर्णधारही होता. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच सामना रद्द करण्यात आला.


अल्जेरियन फुटबॉलपटू सोफियानेच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संपूर्ण क्रीडा जगतावर शोककळा पसरलीये. या अपघातानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. लॉकरच्या मृत्यूनंतर सामना थांबवण्यात आला. तोपर्यंत मौलौदिया सैदाने 1-0 अशी आघाडी घेतली होती.