Jasprit Bumrah Potential Replacements: चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy 2025) अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच भारतीय संघात टेन्शनचं वातावरण आहे.  याचे कारण असे की टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळेल की नाही याची अद्याप खात्री नाहीये. त्याची निवड झाली पण तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याने सामना सुरु असतानाचा मैदान सोडले. त्यावेळी तो  दुसऱ्या डावात गोलंदाजीही करू शकला नाही. त्यातुन तो अद्याप फिट होऊ शकला नाही आणि लवकरच न्यूझीलंडमधील डॉक्टरांशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतरच तो आयसीसी स्पर्धेत खेळणार की नाही याबद्दल समजेल. 


बुमराहची जागा कोण घेणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराह हा जागतिक क्रिकेटमधील आधुनिक बेस्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 32 विकेट घेणारा तो गोलंदाज होता. अशा परिस्थितीत बुमराह भारतीय टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण जर तो पूर्णपणे ठीक झाला नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. अशावेळी त्याची जागा कोण घेणार याबद्दल चर्चा आहे. चला अशा 4 गोलंदाजांबद्दल जाणून घ्या जे त्याची जागा घेऊ शकतात.


हे ही वाचा: Virat Kohli: 25 वर्षाच्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत झाला बाहेर


 


प्रसिध कृष्ण


प्रसिध कृष्ण हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. ज्याला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्याचा उत्तम अनुभव आहे. तो भारताकडून 17 वनडे खेळला आहे. या कालावधीत त्याने 25.58 च्या सरासरीने आणि 5.60 च्या इकॉनॉमीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे अनुभव आणि वेग आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जसप्रीत बुमराहची जागा घेणाऱ्या संभाव्य उमेदवारांपैकी प्रसिध कृष्णा एक आहे.


मुकेश कुमार


मुकेश कुमार हाही गोलंदाज आहे जो जसप्रीत बुमराह बाद झाल्यास संघात सामील होऊ शकतो. त्याने 51 प्रथम श्रेणी सामन्यात 207 विकेट घेतल्या. भारतासाठी, त्याने 6 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि 17 टी-20 मध्ये 20 विकेट्स घेतल्या. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव लक्षात घेता, भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बुमराहच्या जागी त्याच्या दमाचा म्हणून मुकेश कुमारकडे बघितले जात आहे. 


 हे ही वाचा: Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच


 


हर्षित राणा


ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे मालिकेत हर्षित राणा भारतीय संघाचा भाग होता. मात्र, 22 वर्षीय खेळाडूला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीच्या या 23 वर्षीय क्रिकेटपटूने आतापर्यंत 14 लिस्ट ए सामने खेळले असून 22 विकेट्स घेतल्या आहेत.तो ऑस्ट्रेलियात दोन कसोटी खेळला. याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराहचा बॅकअप म्हणून हर्षित राणाला तयार केले जात आहे.


 हे ही वाचा: 2 तास 3 मिनिटांचा तो थ्रिलर चित्रपट, जिवंत शरीरातून हृदय काढून विकले; याच्या कथा आणि सस्पेन्सपुढे 'दृश्यम'ही फेल


 


मोहम्मद सिराज


भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली नाही. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.मोहम्मद शमी किंवा जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत सिराजने टीम इंडियाची धुरा सांभाळली. मात्र कामगिरीतील घसरणीमुळे सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघातून वगळण्यात आले.आता बातमी येत आहे की, हर्षितप्रमाणेच सिराजही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार होत आहे. अशा स्थितीत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.