IPL 2025 Mega Auction: क्रिकेट जगतातील सर्वात गाजलेली स्पर्धा म्हणजे आयपीएल. यंदाचा आयपीएलचा मेगा लिलावही गाजणार आहे. बदलेले वेगवगेळे नियम ते नवे खेळाडू या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांचे डोळे आयपीएलच्या लिलावाकडे लागले आहेत. आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव  24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती, मात्र आता अंतिम यादीत 574 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये केवळ तरुणच नाही तर वृद्ध खेळाडूही आपले नशीब आजमावतात. नेहमीप्रमाणेच यावेळीही मेगा लिलावात हे पाहायला मिळणार आहे. 13 वर्षांच्या खेळाडूंपासून ते 42 वर्षांचे दिग्गज लिलावात दिसणार आहेत.


'हा' खेळाडू आहे लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन हा IPL 2025 मेगा लिलावात 42 वर्षे आणि 110 दिवसांचा (17 नोव्हेंबरपर्यंत) सर्वात वयस्कर खेळाडू आहे. खूप वेळानंतर या खेळाडूने लिलावासाठी नोंदणी केली. गेल्या दशकात त्याचे लक्ष फक्त इंग्लंडकडून कसोटी सामने खेळण्यावर होते. अँडरसनने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो लिलावात उतरला आहे. विशेष म्हणजे एवढ्या खेळाडूंमधून लिलावासाठी त्याला शॉर्टलिस्टही करण्यात आले आहे. अँडरसनने त्याची बेस किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे, जी बीसीसीआयने लिलावासाठी सादर केलेली नवीन बेस प्राइज स्लॉट आहे.


हे ही वाचा: Video: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने 'G.O.A.T' ला केले थक्क


 




हे ही वाचा: Viral: ‘कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?


 


मेगा लिलावात सर्वात तरुण खेळाडू कोण?


यंदाच्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय १३ वर्षे आहे (१५ नोव्हेंबरपर्यंत). 27 मार्च 2011 रोजी जन्मलेल्या या अष्टपैलू फलंदाजाने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.मात्र, T20 चा अनुभव नसल्यामुळे आगामी लिलावात बोली लागण्याची शक्यता कमी आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन चार दिवसीय रेड-बॉल क्रिकेट सामने खेळणाऱ्या भारताच्या अंडर-19 संघाचा वैभव देखील एक भाग होता.त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, आता तो रणजी ट्रॉफीमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे.