Who Is Claudia Mancinelli Olympics 2024: पॅरिसमधील ऑलिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता झाली असली तरी या स्पर्धेमधील काही चेहरे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. केवळ खेळाडूचं नाही तर आता प्रशिक्षकांचीही सोशल मीडियावर चर्चा दिसून येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये आता एका फार सुंदर तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्या महिलेचे फोटो व्हायरल झाले आहेत तिचं नाव आहे, क्लॉडिया मॅन्सिनेली!


ही महिला आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता क्लॉडिया मॅन्सिनेली कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माजी अभिनेत्री असून सध्या इटलीच्या रिऱ्दमिक जिमनॅस्टीक्सची प्रशिक्षक आहे. सध्या ती सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून चर्चेत असून तिच्या सौंदर्यावर अनेकजण भाळले आहेत. खरं तर क्लॉडिया मॅन्सिनेली अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती थेट पंचांना भिडली. अगदी रागामध्ये पंचांजवळ जाऊन तिने घातलेल्या वादाचा संघाला फायदा झाला. सध्या तिला अनेकजण 'क्विन' म्हणून संबोधत आहेत. तिच्या व्हायरल व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळालेत.


ती चर्चेत येण्यासाठी कारणीभूत ठरला हा प्रसंग


इटलीची जिमनॅस्ट सोफिया राफेली मेडलच्या सामन्यात खेळत असताना पंचांच्या निर्णयामुळे ती बाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अचानक तिची प्रशिक्षक क्लॉडिया मॅन्सिनेली पंचांजवळ गेली आणि त्यांना त्यांची चूक समजावून सांगू लागली. तुम्ही दिलेले अंक चुकीचे असून एकदा तपासून पहावे असं तिथे वाद घालत तिने पंचांना पटवून दिलं. 39 वर्षीय क्लॉडिया मॅन्सिनेलीने अगदी तावातावात जाऊन पंचांना आपला मुद्दा सांगितल्यानंतर ती ज्या पद्धतीने लूक देत आपल्या जागी जाऊन बसली त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिने दिलेल्या लूकने अनेकजण घायाळ झाल्याचं सोशल मीडियावरील व्हायरल चर्चेतून दिसून येत आहे. मात्र खरोखरचं क्लॉडिया मॅन्सिनेलीने घातलेल्या वादामुळे सोफिया राफेलीला कांस्य पदक मिळवता आलं. क्लॉडिया मॅन्सिनेलीचा हा वाद घालताना आणि लूक देत जागेवर जाऊन बसण्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्हीच पाहा...



कौतुकाचं वर्षाव


सध्या या व्हिडीओनंतर क्लॉडिया मॅन्सिनेलीची पर्सनॅलिटी आणि तिचा स्वॅगवाला अॅटीट्यूड नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचं लोक कौतुक करत आहेत.


1)



2)



ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री कशी?


क्लॉडिया मॅन्सिनेलीचा जन्म फॅब्रियानोमध्ये झाला. तिला लहानपणापासून जिमनॅसटीक्सची गोडी लागली. तिने क्रिस्टीना घिउरोवा आणि मिर्ना बाल्डोनी यांच्या प्रशिक्षणाखाली शिकण्यास सुरुवात केली. तिने स्थानिक स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र अचानक तिने तिचं करिअर मनोरंजन क्षेत्रात अभिनेत्री म्हणून करण्याचा निर्णय़ घेतला. तिने 'युनिक ब्रदर्स', 'द टुरिस्ट', 'नाईन' यासारख्या चित्रपटांमधून भूमिका साकारली. ऑलिम्पिकच्या अवघ्या 10 महिन्यांआधी इटलीच्या संघाच्या प्रशिक्षक ज्युलीटा कांतलुप्पी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही जबाबदारी क्लॉडिया मॅन्सिनेली यांच्यावर सोपवण्यात आली.