मुंबई : वेस्ट इंडिजनंतर टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचीही टी-20 सिरीज जिंकली. रोहित शर्माने टीमचं कर्धणारपद स्विकारल्यानंतर सलग तिसरी सिरीज जिंकली आहे. दरम्यान श्रीलंकेविरूद्धची सिरीज जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफी पकडली होती. मात्र यानंतर त्याने एका खास व्यक्तीच्या हातात ही ट्रॉफी दिली. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर हा व्यक्ती कोण असा सवाल विचारला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिरीज संपल्यानंतर प्रेझेंटनेशन सेरेमनी झाली. यावेळी कर्णधार रोहित शर्माला ट्रॉफी मिळाली आणि तो टीम इंडियाच्या इतर खेळाडूंकडे गेला. फोटो सेशन झाल्यानंतर रोहित शर्मा जयदेश शहाकडे गेला आणि त्याच्या हातात ही ट्रॉफी दिली. 


जयदेव शाह श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टी-20 सिरीजमध्ये बीसीसीआयकडून टीम इंडिया सोबत राहणारे प्रतिनिधी आहेत. प्रत्येक सिरीज, टूर्नामेंट किंवा मॅचमध्ये बोर्डाकडून एक अधिकारी नेहमी टीम इंडियासोबत असतो. शिवाय हा व्यक्ती मॅनेजर देखील असतो. 



सौराष्ट्र टीमचे कर्णधार होते जयदेव शर्मा


जयदेव शाह स्वतः एक क्रिकेटर आहेत आणि रणजीमध्ये त्यांनी सौराष्ट्राच्या टीमची धुरा सांभाळली होती. जयदेव शहा यांनी 120 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 30 च्या सरासरीने 5354 रन्स केलेत. यामध्ये दहा शतकांचाही समावेश आहे. 


टीम इंडियाने विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने लंका दहन केलं आहे. टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.