IPL Auction 2025: `आल्याबरोबर केली कामाला सुरुवात...`, कोण आहे किरणकुमार ग्रांधी? सोशल मीडियावर होतायेत Viral
Kiran Kumar Grandhi: जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरू आहे. लिलाव सुरू होताच, किरण कुमार ग्रांधी हे सोशल मीडियावर ट्रेंड झाले.
IPL 2025 Auction Memes: जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना विकत घेण्यात आले आहे. दरम्यान खेळाडू सोडून एक वेगळं नाव चर्चेत आलं आहे. लिलाव सुरू होताच, दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक किरण कुमार ग्रांधी सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. मार्की खेळाडूंच्या पहिल्या सेटमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 11 कोटी 75 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 साठी अक्षर पटेल (रु. 16.50 कोटी), कुलदीप यादव (रु. 13.25 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (रु. 10 कोटी) आणि अभिषेक पोरेल (रु. 4 कोटी) यांना कायम ठेवले आहे.
सोशल मीडियावर किरण कुमार ग्रांधी झाले ट्रेंड
का झाले ट्रेंड?
किरण कुमार ग्रांधी यांनी पंजाब किंग्स (PBKS) कडून श्रेयस अय्यरसाठी जोरदार बोली लावली. मात्र, आयपीएलच्या इतिहासात विक्रमी बोली लावत पंजाबने अखेर अय्यरला २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्ली कॅपिटल्सने पंतसाठी 20 कोटी 75 लाख रुपयांची आरटीएम वापरली, परंतु एलएसजीने 6 कोटी 25 लाख रुपयांची मोठी रक्कम वाढवली, ज्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने स्वतःला शर्यतीतून बाहेर केले आणि पंत लखनौला विकला गेला.
हे ही वाचा: 20 कोटी ते थेट 27 कोटी...! 'हा' खेळाडू ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
कोण आहेत किरण कुमार ग्रांधी?
किरण कुमार ग्रांधी हे आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सह-मालक आहेत. किरण ग्रांधी हे वाणिज्य पदवीधर आहेत. ते 1999 पासून GMR समूहाच्या संचालक मंडळावर आहे. GMR समूहासाठी अनेक मोठे पायाभूत प्रकल्प सुरक्षित करण्यात ग्रांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हैदराबाद, दिल्ली, इस्तंबूलसह प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी यशस्वी बोली लावण्यात आणि दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 3 च्या बांधकामाला गती देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.