Who is Suyash Sharma: बंगळुरुविरोधात (Royal Challengers Bangalore) झालेल्या सामन्यात गुरुवारी कोलकाताने (Kolkata Knight Riders) मोठ्या विजयाची नोंद केली. कोलकाताने तब्बल 81 धावांनी हा सामना जिंकला. बंगळुरुने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे कोलकाताची स्थिती 89 धावांवर 5 गडी बाद अशी झाली होती. मात्र शार्दुल ठाकूर () आणि रिंकू सिंग यांनी भागीदारी करत संघाला सावरलं आणि धावसंख्या 200 च्या पार नेली. कोलकाताने बंगळुरुसमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बंगळुरु संघ 123 धावांवर ऑल आऊट झाला आणि 81 धावांनी पराभव झाला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती याने चार गडी बाद करत सर्वात गोलंदाजीत मोठं योगदान दिलं. त्याच्यानंतर जर कोणी आपली छाप सोडली असेल तर तो म्हणजे पहिलाच सामना खेळणारा सुयश शर्मा...त्याने तीन गडी बाद करत बंगळुरुच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. सामना संपल्यानतंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये कोलकाताचा 19 वर्षीय सुयश शर्मा नेमका कोण आहे अशी चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुयश शर्मा हा मूळचा दिल्लीचा आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या मिनी लिलावात कोलकाताने 20 लाख रुपयात विकत घेतलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, बंगळुरुविरोधातील प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र वेंकटेश अय्यरच्या जागी त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बोलावण्यात आलं होतं. 



सुयश शर्मा दिल्लीकडून अंडर-25 संघात खेळतो. विशेष म्हणजे त्याने याआधी एकही प्रथमश्रेणी किंवा टी-20 सामना खेळलेला नव्हता. 



सामन्यानंतर सुयशबद्दल बोलताना कोलकात्याचा कर्णधार नितीश राणा याने सांगितलं की "सुयश हा एक आत्मविशास असणारा तरुण आहे. त्याचा स्वत:वर विश्वास आहे. त्याने दिलेल्या संधीचं सोनं केलं आणि त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते पाहणं पर्वणीचं होतं".



दुसरीकडे कोलकाताचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सांगितलं की "वरुण आणि सनीने चांगली गोलंदाजी केली. दुसरीकडे नवख्या खेळाडूंनी चांगली मदत केली. आम्ही त्याला ट्रायल सामन्यात पाहिलं होतं आणि ज्याप्रकारे तो गोलंदाजी करत होता ते पाहून आनंद झाला होता. त्याची गोलंदाजी चांगली असून त्याला खेळणं अवघड आहे. त्याला अनुभव नाही, पण वृत्ती चांगली आहे".


शार्दूल ठाकूरची तुफान फलंदाजी


कोलकाताचे आघाडीचे फलंदाज लवकर तंबूत परतल्यानंतर शार्दुल ठाकूरने संघाला सावरलं. कोलकाताची स्थिती 89 धावांवर 5 गडी बाद अशी होती. पण शार्दूल ठाकूरने 29 चेंडूत 68 धावा ठोकत तुफान फलंदाजी केली. शार्दूल ठाकूर आणि रिंकू सिंगने केलेल्या 146 धावांच्या भागीदारीमुळे संघाने 200 चा टप्पा ओलांडला. दरम्यान बंगळुरुचा संपूर्ण संघ अवघ्या 123 रन्सवर तंबूत परतला आणि कोलकाताने 81 धावांनी हा सामना जिंकला.