Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसोबत दिसणारी `ती` मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो
Shreyas Iyer: आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रेयस अय्यरसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
Shreyas Iyer: नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादच्या टीमचा पराभव केला. या विजयासह कोलकात्याने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर या आयपीएलमध्ये चांगली. या मोठ्या यशानंतर केकेआरची संपूर्ण टीम सेलिब्रेशनमध्ये आहे. तर दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यरही प्रकाश झोतात आल्याचं दिसून आलंय.
आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर श्रेयस अय्यरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रेयस अय्यरसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
श्रेयससोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?
अय्यरसोबत फोटोमध्ये असलेली ही मुलगी अफगाणिस्तानची ब्युटी क्वीन वाजमा अयुबी आहे. वाजमा ही क्रिकेटची मोठे चाहती आहे. वाजमाने तिच्या सोशल मीडियावर श्रेयस अय्यरसोबतचा फोटो शेअर केला आहे. वाजमा यांनी अय्यरसोबतचा तिचा फोटो शेअर करताच ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली.
टीम इंडियाला सपोर्ट करते वाजमा
वाजमा ही क्रिकेटचा मोठा चाहती असल्याचं समोर आलं आहे. अफगाणिस्तानसोबतच ती टीम इंडियालाही खूप सपोर्ट करते. त्याला अनेकदा स्टेडियममध्ये भारतीय टीमसाठी चिअर करताना दिसली आहे. याशिवाय वाजमा इंडियन प्रीमियर लीगचे सामने पाहण्यासाठीही येते. वाजमा सध्या दुबईत राहते, पण तिच्या मॉडेलिंगच्या कामासाठी ती अनेकदा भारतात येत असते.
आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यानंतर भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये चॅम्पियन आणि उपविजेत्या टीमवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अवॉर्ड देण्यात आले. विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला 20 कोटी रुपये, तर उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 12.50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
टॉप 4 टीम्सना किती मिळाली प्राईज मनी
विजेती टीम (कोलकाता नाईट रायडर्स) - 20 कोटी रुपये
उपविजेती - (सनराईजर्स हैदराबाद) - 12.5 कोटी रूपये
तिसरी टीम (राजस्थान रॉयल्स) – 7 कोटी रुपये
चौथी टीम (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – 6.5 कोटी रुपये