नागपूर : श्रीलंकेविरुद्धची सीरिज संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी विराट कोहलीनं भारतीय संघाच्या निवडीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. परदेशात खेळताना आम्ही दोन स्पिनर्सना संघात जागा देऊ शकत नाही, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या या वक्तव्यामुळे भारताचे आघाडीचे फिरकीपटू आर. अश्विन, रविंद्र जडेजा यांच्यापैकी कोणाची आफ्रिका दौऱ्यासाठी निवड होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच गेल्या काही मॅचमध्ये कुलदीप यादवनंही चांगलं प्रदर्शन केलं आहे. पण जडेजा आणि अश्विननं तळाला बॅटिंगला येऊन अनेकवेळा चांगला स्कोअर केला आहे. त्यामुळे या तिघांपैकी आफ्रिका दौऱ्यात कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.


भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या १३ मॅचपैकी फक्त एकाच मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. या १३ मॅचमध्ये अश्विननं ८३ विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धची ३ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी-20ची सीरिज संपल्यावर भारत आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. २०१८च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भारत दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. आफ्रिकेमध्ये भारत ३ टेस्ट ६ वनडे आणि ३ टी-20ची सीरिज खेळणार आहे.