मुंबई : आयपीएलमध्ये एक यशस्वी टीम म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे पाहण्यात येतं. महेंद्रसिंद धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गेल्या वर्षी CSK साठी फाफ ड्यू प्लेसिसने अनेक विनिंग खेळी खेळल्या आहेत. मात्र आता यावर्षी फाफ ड्यू प्लेसिस सीएसके टीमचा भाग नसून तो रॉयल चॅलेंजर बंगळूच्या ताफ्यात आहे. त्यामुळे आता सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडसोबत ओपनर म्हणून कोण उतरणार हा मोठा प्रश्न आहे.


हा खेळाडू करणार ओपनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सिझनमध्ये ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस या दोघांनी मिळून ओपनिंग केली होती. मात्र आता फाफ सीएसकेमध्ये नसल्याने डेवोन कॉनवे (Devon Conway) ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. 


CSKकडे डेवोन कॉनवे सारखा धडाकेबाज फलंदाज आहे. जो ऋतुराज गायकवाडसोबत चांगली ओपनिंग करू शकतो. डेवोन कॉनवे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. त्याने इंटरनॅशनल सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून उत्तम खेळी केल्या आहेत. कॉनवे पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडसोबत तो एक उत्तम ओपनर म्हणून उतरू शकतो. 


डेवोन कॉनवे मैदानावर उतरल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ घेतो. कॉनवेने न्यूझीलंडसाठी 20 टी 20 सामन्यांमध्ये 602 रन्स केले आहेत. ज्यामध्ये एक 99 रन्सच्या खेळीचाही समावेश आहे. न्यूझीलंड टीमला टी-20 वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी कॉनवेचं मोठं योगदान होतं. त्यामुळे महेंद्र सिंग धोनी कॉनवेवर विश्वास टाकून त्याला फाफच्या जागी उतरवू शकतो.