मुंबई : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या नावानुसार मोठा विराट निर्णय घेतला. विराटने टी 20, वनडेनंतर आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. तसेच त्याने माजी हेड कोच रवी शास्त्री, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले. विराटने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. (who will become of test cricket team captain of  india after virat kohli steps down captaincy)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विराटनंतर आता कसोटी संघाचं नेतृत्व कोण करणार, अशा चर्चांना उत आलं आहे. सध्या टीम इंडियाच्या कसोटी टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा आहे. रोहित दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे केएल राहुल सध्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.


आता विराटने कॅप्टन्सीला रामराम ठोकलाय. त्यामुळे नियमांनुसार, रोहितचीच कसोटी संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.


रोहितला कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबईला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलंय. विराटच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा कॅप्टन्सीची धुरा यशस्वी सांभाळली आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट कर्णधार म्हणून रोहित शर्मावर विश्वास दाखवणार की नव्या भिडूला संधी देणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे.