मुंबई : 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. 16 खेळाडूंच्या या टीममध्ये काही नवीन आणि दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीत विश्रांतीवर असेल आणि कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला पहिल्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे. तर आता प्रश्न असा आहे की, पहिल्या कसोटीत विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार..


हा फलंदाज चौथ्या क्रमांकाचा दावेदार


विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत विराटऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अय्यर सर्वात मोठा दावेदार मानला जातोय. 


अय्यरसाठी ही भारताकडून खेळणारी पहिलीच कसोटी मालिका असेल. देशांतर्गत क्रिकेटमध्येही या फलंदाजाने अनेकवेळा दाखवून दिलं आहे की तो कसोटीतही चांगला फलंदाज होऊ शकतो.


सूर्यकुमारच्या जागी अय्यर


श्रेयस अय्यरला प्रथमच संघात संधी देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला होता. त्यावेळी सूर्यकुमार टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांनंतर कसोटी सामन्यांमध्ये दिसेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र त्याला कोणत्याही कसोटीशिवाय संघातून वगळण्यात आलंय.


पहिल्या टेस्टसाठी अशी असेल भारतीय टीम


अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्द कृष्णा