IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी `या` तीन खेळाडूंचं नाव चर्चेत
Chennai super kings, IPL 2024 Auction : बेन स्टोक्स टीममध्ये नसेल तर त्याच्या जागी कोण खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. स्टोक्सच्या जागी या तीन खेळाडूंचं नाव धोनीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे.
Ben Stokes replacement In IPL 2024 : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार आणि ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने आयपीएल 2024 पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai super kings) मोठा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सला चेन्नईने 16 कोटीमध्ये खरेदी केलं होतं. मात्र, त्याचा काही फायदा चेन्नईला झाल्याचं पहायला मिळालं नाही. अशातच आता बेन स्टोक्स टीममध्ये नसेल तर त्याच्या जागी कोण (IPL 2024 Auction) खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. स्टोक्सच्या जागी या तीन खेळाडूंचं नाव धोनीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे.
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड)
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या डॅरिल मिशेलला यंदाच्या लिलावात मोठी बोली लागू शकते. बेन स्टोक्सचा तोडीसतोड खेळाडू अशी त्याची ओळख आहे. न्यूझीलंडसाठी त्याने अनेक महत्त्वाचे सामने खेचून आणले आहेत. भारताविरुद्ध त्याने वर्ल्ड कपमध्ये शतक देखील झळकावलं होतं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचं सर्वाधिक लक्ष डॅरिल मिशेलवर (Daryl Mitchell) असणार आहे.
अजमतुल्ला ओमरझाई (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडर अजमतुल्ला ओमरझाई याच्या कामगिरीवर धोनी खूश असल्याचं बोललं जातंय. तो चेन्नईसाठी चांगला आणि योग्य पर्याय ठरू शकतो. वर्ल्ड कपमध्ये त्याने 353 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे धोनी ब्रिगेडमध्ये अजमतुल्ला ओमरझाई (Azmatullah Omarzai) याला संधी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मार्कस स्टॉयनिस (ऑस्ट्रेलिया)
वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नसली तरी मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने ऑस्ट्रेलियासाठी याआधी उत्तम कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये स्टॉयनिसला राखीव म्हणून देखील ठेवलं होतं. अशातच चेन्नईची नजर मार्कस स्टॉयनिस याच्यावर असणार आहे. त्यामुळे धोनीनंतर किंवा क्रमांक 4 ला चेन्नईसाठी चांगला पर्याय उपलब्ध असेल.
आणखी वाचा - Diamond Duck म्हणजे काय? ज्यामुळे ऋतुराज आणि अर्शदीप ठरले अनलकी!
दरम्यान, लखनऊ सुपरजायंट्सने रोमारियो शेफर्डसाठी मुंबई इंडियन्सकडे 50 लाखांचा व्यापार केला होता. तर देवदत्त पडिक्कलला राजस्थान रॉयल्सकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे पाठवण्यात आलं आहे. त्याला 7.5 कोटीच्या किंमतीवर संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर आवेश खानला लखनऊ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सला 10 कोटी रुपयांचा व्यापार केला. त्यामुळे आता आयपीएल ऑक्शनमध्ये चेन्नई कोणावर दाव लावणार? यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.