अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व पण...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
जयपूर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. स्मिथऐवजी आता अजिंक्य रहाणेकडे राजस्थानच्या टीमचं नेतृत्व असेल.
असं आहे अजिंक्यचं रेकॉर्ड
अजिंक्य रहाणेकडे राजस्थानच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं असलं तरी अजिंक्य रहाणेचं टी-20 क्रिकेटमधलं नेतृत्वाचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. रहाणेनं आयपीएलच्या ४ मॅचमध्ये नेतृत्व केलं आहे. यामध्ये फक्त एका मॅचमध्ये त्याला विजय मिळालाय तर उरलेल्या तीन मॅचमध्ये पराभव झालाय. तर लिस्ट ए कारकिर्दीमध्ये अजिंक्यनं ४ मॅचमध्ये कर्णधारपद भुषवलं आहे. यातल्या ३ मॅचमध्ये त्याचा विजय तर एका मॅचमध्ये पराभव झाला आहे.
डेव्हिड वॉर्नरचं भवितव्य काय?
स्मिथनंतर आता सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरचं काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर सनरायजर्स हैदराबादचा मेंटर व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनं मौन सोडलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नरबद्दल निर्णय घेतल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं लक्ष्मण म्हणाला आहे.
केप टाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे. सध्यातरी याप्रकरणावर एवढ्या लवकर बोलणं योग्य नाही, असं लक्ष्मण म्हणालाय. वॉर्नरवर कारवाई झाली तर कोणाला कर्णधार करणार असा प्रश्नही लक्ष्मणला विचारण्यात आला. याबाबत आम्ही कोणताही विचार केलेला नाही, अशी प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली. वॉर्नरला हैदराबादचं कर्णधारपद सोडायला लागलं तर शिखर धवनला कर्णधार बनवलं जाऊ शकतं