Corona : सप्टेंबरमध्ये कमी झालेला कोरोना, अचानक एप्रिलमध्ये का वाढतोय, जाणून घ्या 5 कारणे
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना संपतच आला होता, परंतु आता अचानक तो का वाढू लागला, हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडू लागला आहे.
मुंबई : सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना संपतच आला होता, परंतु आता अचानक तो का वाढू लागला, हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडू लागला आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 03 हजार 558 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा मानला जात आहे. केंन्द्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 478 मृत्यू झाले आहेत.
असं का घडतंय?
गेल्या सप्टेंबरपासून, असे काय बदलले आहे की, अचानक कोरोना इतक्या वेगाने वाढू लागला? आता तर कोरोनाची लस देखील आली आहे, अशा परिस्थितीत तर रुग्णसंख्या कमी व्हायला पाहिजे, मग हे असं का होत आहे? यामागे कोणती कारणे आहेत?
कारण 1 : कोरोनात वाचलेल्या लोकांची संख्या मोठी आहे
देशात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले की, कोविड 19 साथीच्या आजारातून मोठी लोकसंख्या अजूनही वाचलेली आहे, ज्यांना संसर्ग अजूणही झाला नव्हता. उदाहरणार्थ, मुंबईत खासगी इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आता कोरोनाची अधिक लक्षणे पाहायला मिळत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये आता जास्त लोक भरती झाले आहेत, सरकारी रुग्णालयात अद्याप बेड रिकामी आहेत. यावरून असे दिसून येते की, भारतात अजूनही अशा मोठ्या संख्येने लोक आहे, ज्यांना धोका असू शकतो. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये अशाच लोकांमध्ये अधिक लक्षणे आढळली आहे.
कारण 2: लोकांनी काळजी घेतली नाही
कोविड 19 पासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे आणि मास्क घालणे हे गरजेचे आहे. कोविड 19ची लस मिळाल्यानंतर लोकांना ही लस घेतली असली किंवा नसली तरीही, सर्वांनी हे मान्य केले आहे की, आता मास्क घालण्याची आहे, सुरक्षीत अंतर ठेवण्याची गरज आहे आणि वारंवार हात धुण्याची गरज नाही.
बाजारपेठा उघडल्या आहेत, पाच राज्यांत निवडणुका होत आहेत, कुंभमेळा चालू आहे, लोकांनी ऑफिसला जाणे सुरू केले आहेत. निवडणुकीच्या काळातल्या चित्रांवरून हे स्पष्ट झाले आहे की कोविड19 च्या विरोधात लोकांना खबरदारी घेण्याचा विसर पडला आहे. त्या गर्दीत नेतेही सहभागी होताना दिसतात. यामुळे हा व्हायरस पुन्हा आक्रमक झाला आहे.
कारण 3 : वेगाने वाढणार्या प्रकरणांमध्ये म्यूटेंटची भूमिका
सर्वेक्षणात या व्हायरच्या वाढण्या मागचे अजून एक कारण समोर आलं आहे ते म्हणजे व्हायरसच्या वागण्यातील बदल. व्हायरसमधील या बदलाला म्यूटेंट म्हटले जाते, जे व्हायरसला त्वरीत पसरण्यास सक्षम बनवत आहेत.
जरी याबद्दल जास्त अभ्यास केला गेला नसेल, परंतु काही थोड्या प्रमाणात जो अभ्यास केला गेला आहे, ज्यावरून असे दिसून येते की, यूकेचा स्टेन आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टेन भारतात आला आहे. याव्यतिरिक्त आणखी एक म्यूटेंट महाराष्ट्रच्या नमुन्यातही सापडला आहे, ज्यावर अजून तरी अभ्यास केलेला नाही.
कारण 4: R संख्या वाढत आहे
कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट यात बराच फरक आहे, जे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. पहिल्या लाटेत कोरोनाची प्रकरणे खूप कमी दराने वाढत होते. परंतु यावेळचा ग्राफ पाहाता, कोरोना केसेस बर्याच वेगाने वाढत आहेत. याचा अर्थ असा आहे की, संसर्गाचे प्रमाण, ज्याला R संख्या म्हणून देखील ओळखले जाते, ते वेगाने वाढत आहे.
R संख्या व्हायरसच्या प्रजननाची संख्या सांगतो. पहिल्या लाटेदरम्यान ही R संख्या 2 ते 3च्या दरम्यान होते. पण दुसर्या लाटेत ते 3ते 4च्या दरम्यान आहे. हे या गोष्टीची माहिती देतात की, दुसर्या लाटेतील विषाणू हे मागील वर्षाच्या विषाणूच्या तुलनेत वेगळा आहे.
कारण 5: लोक शहरात परत येत आहेत?
या व्हायरचे वाढण्यामागचे कारण शहरात लोकं परत येत असल्यामुळे ही झाला आहे असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाब ही अशी राज्ये आहेत, ज्यामधून लॉकडाऊन दरम्यान मोठ्या संख्येने लोक आपल्या राज्यात परत गेले होते. सर्व काही उघडल्यानंतर आणि लसीमुळे लोक पुन्हा शहरांकडे वळले आहेत. शहरांमध्ये कोरोना वाढण्याचे हे एक कारण असू शकते.