क्रिकेटर Murali Vijay ने का केलं Dinesh Karthik च्या पत्नीशी लग्न?
आयपीएलच्या 5 व्या सिझनमध्ये मुरली विजय आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांमधील संबघ दृढ झाले.
Murali Vijay : टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक वर्ष चांगला खेळ केल्यानंतर मुरली विजय (Murali Vijay) एका मोठ्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) जन्म झालेल्या मुरली विजयला लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा खेळामध्ये रस जास्त होता. प्रायमरी शाळेत असतानाच त्याला क्रिकेट खेळायला आवडायचं. मुरली विजयच्या अभ्यासाचा त्याच्या खेळावर खोलवर परिणाम झालेला दिसून आला.
वडिलांच्या रागाचा करावा लागला सामना
12वी बोर्डाच्या परिक्षेत मुरली विजयचला केवळ 40% मिळाले होते. कमी मार्क मिळाल्यामुळे त्याला वडिलांचा ओरडा मिळाला होता. यावेळी त्याचे वडील इतके चिडले होते की, रागात त्यांनी मुरली विजयला तु जीवनात कधी शिपाई सुद्धा बनणार नाही, असं म्हणाले होते. ही गोष्ट मुरली विजयच्या मनाला खूप लागली होती.
वयाच्या 17 व्या वर्षी घर सोडलं
मुरली विजय जेव्हा 17 वर्षांचा होता, तेव्हा त्याने स्वतःच्या प्रगतीसाठी घर सोडलं होतं. घर सोडल्यानंतर मुरली विजयने स्नूकर क्लबमध्ये काम केलं आणि तो तिथेच राहू लागला. यामध्ये त्याला जे काही पैसे मिळत होते, त्यामधून तो पुढचं शिक्षण घेतलं.
शांत स्वभाव आणि संतुलित व्यक्तिमत्त्व असल्याने इंटरनेशनल क्रिकेटमध्ये मुरली विजयला साधूची उपमा देण्यात आली होती. आयपीएलच्या 5 व्या सिझनमध्ये मुरली विजय आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांमधील संबघ दृढ झाले. यामुळे कार्तिकची पत्नी निकिता बंजारा देखील कार्तिकशी भेटू लागली. हळू-हळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मुरली विजयने निकिताशी लग्न केलं.
टेस्ट क्रिकेटमध्ये सोडली छाप
मुरली विजयने टीम इंडियासाठी एकूण 61 टेस्ट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 38.9 च्या सरासरीने 3982 रन्स केले आहेत. मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 12 शतकं झळकावलीयेत. शिवाय दोन शतकांच्या मदतीने आयपीएलमध्ये त्याच्या नावे 2619 रन्सची नोंद आहे.