Hardik Pandya: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये देखील मुंबई इंडियन्सची सुरुवात काही फारशी चांगली झाल्याचं दिसून आलं नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 20 रन्सने पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील हा चौथा पराभव होता. दरम्यान चेन्नईविरूद्धच्या सामन्यात केवळ रोहित शर्माला चांगला खेळ दाखवता आला. मात्र या सामन्यानंतर अशी एक घटना घडली, ज्यामुळे रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत असं का केलं, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. रोहित शर्माने नेमकं हार्दिक पंड्याचं काय बिघडवलं आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे. चेन्नईविरूद्धचा सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत अशोभनिय कृत्य केल्याचं समोर आलं आहे. 


हार्दिकने नेमकं काय म्हटलं?


यंदाच्या सिझनमधील चौथा सामना गमावल्यानंतर हार्दिक पंड्याने चेन्नईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. हार्दिक पंड्या म्हणाला की,  "आम्हाला दिलेलं लक्ष्य साध्य करण्यासारखं होतं. मात्र त्यांनी फारच उत्तम गोलंदाजी केली. पाथिरानाने केलेली कामगिरीच विजय आणि पराभवातील अंतर ठरली. ते त्यांच्या नियोजनामध्ये आणि सामन्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासंदर्भात आमच्याहून सरस निघाले."


चेन्नईच्या संघाला स्टम्पमागे उभा असलेली व्यक्ती (धोनी) कोणत्या गोष्टी कशा केल्याने उपयोगी ठरतील आणि कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरणार नाही यासंदर्भातील मार्गदर्शन त्यांच्या गोलंदाजांना करते आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. खेळपट्टीवरुन चेंडू थोडा थांबून येत होता आणि त्यामुळेच धावा करणं कठीण गेलं," असं हार्दिक म्हणाला. 


हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत नेमकं काय केलं?


या सामन्यानंतर हार्दिक पंड्याने विरूद्ध टीमच्या खेळाडूंचं आणि कर्णधाराचं कौतुक केलं. मात्र यावेळी ज्या खेळाडूने मुंबईच्या टीमसाठी शतक झळकावलं आणि एकाकी झुंज दिली त्या रोहित शर्माबाबत हार्दिकने एकही शब्द उच्चारला नाही. आपल्या टीममधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूबाबत एक चकार शब्दही कर्णधाराच्या तोंडातून न येणं हे अशोभनिय असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हार्दिक पंड्या हे सर्व रोहितच्या द्वेषापोटीच करत असल्याचंही काही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हार्दिक आणि रोहित या दोघांमध्ये पुन्हा काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.