Kapil Dev 1983 World Cup Record: भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) इतिहासात 18 जून हा दिवस सुवर्णअक्षरांनी नोंदवण्यात आला आहे. 40 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी एक अभुतपूर्व खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये (1983 World Cup) कपिल देव यांनी झिम्बाम्बेविरोधात (Zimbabwe) नाबाद 175 धावांची तुफानी खेली केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने झळकावलेलं हे पहिलं शतक होते. इतकंच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही एखाद्या फलंदाजाने केलेली ही सर्वात मोठी खेळी होती. 


17 धावांवर 5 गडी झाले होते बाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या टनब्रिज वेल्स मैदानात झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण फलंदाजीला सुरुवात होताच भारतीय संघ ढेपाळला होता. सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांची जोडी तर एकही धाव न करता तंबूत परतली होती. यानंतर मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1) आणि य़शपाल शर्माही (9) स्वस्तात बाद झाले होते. यामुळे भारतीय संघाची स्थिती 17 धावांवर 5 गडी बाद अशी होती. 


कपिल देव नावाचं वादळ


यानंतर मैदानात जे काही झालं त्याने इतिहास घडवला. कपिल देव यांनी रॉजर बिन्नी (22) यांच्यासह 60, मदनलाल (17) यांच्यासह 62 और सय्यद किरमानी (नाबाद 24) यांच्यासह 126 धावांची नाबाद भागीदारी केली. यानंतर भारताची धावसंख्या 266 धावांवर 8 गडी बाद होती. कपिल देव यांनी 138 चेंडूत 175 धावा ठोकल्या. यावेळी त्यांनी एकूण 16 चौकार आणि 6 षटकार ठोकले. 


कपिल देव यांच्या वादळी खेळीमुळे भारताने केलेली 266 धावसंख्या झिम्बाम्बेला महागात पडली. संपूर्ण संघ 57 ओव्हर्समध्ये 235 धावांवर ऑल आऊट झाला आणि भारताने 31 धावांनी सामना जिंकला. कपिल देव यांची ही खेळी भारतासाठी ऐतिहासिक ठरली. कारण याच सामन्यानंतर एका आठवड्याने भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. 


मॅच रेकॉर्डच झाली नाही


कपिल देव यांची ही वादळी खेळी क्रिकेटरसिकांना कुठेच पाहायला मिळत नाही. युट्यूबवरही त्याचा एकही व्हिडीओ उपलब्ध नाही. याचं कारण त्यावेळी बीबीसीच्या तंत्रज्ञांनी संप पुकारला होता. यामुळे या सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण झालं नव्हतं. याचमुळे हा सामना कॅमेऱ्यातही रेकॉर्ड होऊ शकला नाही आणि क्रिकेटरसिक एका मोठ्या क्षणाला मुकले. या सामन्याचा अनुभव फक्त त्यावेळी मैदानात उपस्थित प्रेक्षकच घेऊ शकले होते. 


विव्ह रिचर्ड्स यांनी मोडला रेकॉर्ड


कपिल देव यांनी त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या कऱण्याचा रेकॉर्ड केला होता. त्याआधी न्यूझीलंडच्या ग्लेन कार्टर यांनी 1975 मध्ये 171 धावांची नाबाद खेळी केली होती. पण कपिल देव यांचा रेकॉर्ड जास्त काळ टिकला नाही. पुढच्याच वर्षी 1984 मध्ये वेस्ट इंडिजचे फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडविरोधात 189 धावा ठोकत रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.