FIFA WC 2022: फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपतो? Video पाहा आणि समजून घ्या
FIFA WC 2022 Free Kick: स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यानंतर मेस्सी निवृत्ती घेणार असल्याची माहिती मीडियात आहे. दुसरीकडे या स्पर्धेतील काही बाबी पाहून क्रीडाप्रेमींना प्रश्नचिन्ह पडलं आहे. फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपलेला असतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला तर जाणून घेऊयात यामागचं कारण
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला पराभूत करत अर्जेंटिनानं अंतिम फेरी गाठली आहे. आता फ्रान्स विरुद्ध मोरोक्को या सामन्यातील विजयी संघाशी अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत अनेक उलटफेर पाहायला मिळाले. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात सौदी अरबियाने अर्जेंटिना पराभूत केल्यानंतर मेस्सीच्या संघाने जोरदार कमबॅक केलं. अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठली असून याबाबत क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यानंतर मेस्सी निवृत्ती घेणार असल्याची माहिती मीडियात आहे. दुसरीकडे या स्पर्धेतील काही बाबी पाहून क्रीडाप्रेमींना प्रश्नचिन्ह पडलं आहे. फ्री किक मारताना एक खेळाडू जमिनीवर का झोपलेला असतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला तर जाणून घेऊयात यामागचं कारण
मॅच रेफरीने फ्रि किक दिल्यानंतर विरोधी संघाचे खेळाडू एकमेकांना पकडून गोल पोलसमोर भिंत उभी करतात. तर एक खेळाडू त्या खेळाडूंच्या भिंतीमागे आडवा झोपलेला असतो. ब्राझीलनं ही ट्रिक पहिल्यांदा अवलंबली होती, असं बोललं जातं. त्यानंतर दक्षिण अमेरिकेत ही कल्पना रुजली आणि त्यानंतर सर्वच देशांनी ही आयडिया अवलंबण्यास सुरुवात केली. भिंत करून असलेले खेळाडू किक मारल्यानंतर उंच उडी घेतात. याचा काही खेळाडू फायदा घेत भिंतीखालून गोल करायचे. तेव्हा भिंतीमागे एक खेळाडू आडवा झोपण्यास सुरुवात झाली आणि गोल रोखण्यास मदत झाली.
फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने धडक मारली आहे. आता फ्रान्स विरुद्ध मोरोक्को या संघात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. यापैकी विजयी संघ अंतिम फेरीत अर्जेंटिनाशी भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार अंतिम सामना 18 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 8.30 वाजता असणार आहे.