कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं पदार्पण केलं. भारताकडून वनडे खेळणारा शार्दुल ठाकूर २१८वा खेळाडू ठरला आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरनं ७ ओव्हरमध्ये २६ रन्स देऊन एक विकेट घेतली. पण शार्दुल ठाकूरनं घातलेल्या जर्सीमुळेच तो चर्चेत राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरनं १० नंबरची जर्सी घातली होती. १० नंबरची जर्सी म्हणजे सचिन तेंडुलकर असं समीकरणच झालं आहे. पण सचिनच्या नंबरची जर्सी शार्दुलनं घातल्यामुळे त्याला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं.


या सगळ्या प्रकरणावर शार्दुल ठाकूरनं प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या जन्मतारखेच्या अंक गणितामुळे मी जर्सीवर १० नंबरची जर्सी घातल्याचं शार्दुल ठाकूर म्हणालाय. शार्दुलची जन्म तारीख १६ ऑक्टोबर १९९१ म्हणजेच १६-१०-१९९१ आहे. अंकगणितानुसार [(1+6)+(1+0)+(1+9+9+1) = 7+1+(2+0) = 10] हा आकडा १० येत असल्यामुळे मी १० नंबरची जर्सी घातल्याची प्रतिक्रिया शार्दुलनं दिली आहे.