IND VS ENG 3rd T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टी 20  सीरिज सुरु असून यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने (Team India) विजय मिळवून सिरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली होती. राजकोटच्या निरंजन स्टेडियमवर मंगळवारी खेळवला जाणारा तिसरा टी 20 सामना जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची सुवर्ण संधी टीम इंडियाकडे होती. मात्र ही संधी सूर्या अँड कंपनीने वाया घालवली असून सीरिजमधील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला. त्यामुळे आता सीरिज 2-1 अशा स्थितीत आहे. 26 धावांनी मंगळवारी टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हा या पराभवासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याविषयी जाणून घेऊयात. 


संजू सॅमसन ठरला फेल : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन सलग तिसऱ्यांदा ,मोठी धावसंख्या करण्यास फेल ठरला. अभिषेक शर्मासोबत इनिंगची चांगली सुरुवात करून देणे ही जबाबदारी संजूवर होती, परंतु यात ती अपयशी ठरला. विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन 6 बॉलमध्ये केवळ 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने संजूची विकेट घेतली. संजूने पहिल्या टी २०मध्ये 26 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने 5 धावा केल्या होत्या. संजू स्वस्तात बाद झाल्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची चांगली सुरुवात होऊ शकली नाही. 


हेही वाचा : 'मी भारतासाठी कसा खेळू शकतो?', चिमुरड्याची मैदानातच विराटला विचारणा; त्याच्या वडिलांसमोर म्हणाला 'तुझ्या...'


कर्णधार सूर्यकुमार यादव राहिला फ्लॉप : 


कर्णधार सूर्यकुमार यादव हा इंग्लंड विरुद्ध सीरिजच्या तीनही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात सूर्याकडून टीम इंडियाला मिडिल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, परंतु सूर्या केवळ 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यापूर्वी पहिल्या दोन टी 20 मध्ये सूर्यकुमारला काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. टीम इंडियाचा टी 20 कर्णधार झाल्यानंतर सूर्याच्या फलंदाजीचा आलेख खाली पडत चालला आहे. तिसऱ्या सामन्यात सूर्याने 7 बॉल खेळून एक चौकार आणि एक षटकार लगावला, परंतु 200 स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या सूर्याला  मार्क वुडने बाद केले. 


मोहम्मद शमीची जादू चालली नाही : 


भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचे 436 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. परंतु तो पुनरागमनाच्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. शमीने 3 ओव्हर गोलंदाजी करून 25 धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. शमीने नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे वर्ल्डनंतर टीम इंडियात पदार्पण केलं. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहची जागा घेणार्‍या शमीला एकही विकेट घेणं शक्य झालं नाही. तर हार्दिक पंड्याने 2, रवी बिष्णोई आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 तसेच वरूण चक्रवर्तीने इंग्लंडच्या सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.