मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली हा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानातील त्याचा खेळ ते अगदी त्याची हेअर स्टाईल आणि टॅटूपर्यंत त्याचे चाहते दिवाने आहेत. पण प्रत्येक खेळाडूची ओळख ही त्याचा खेळ,स्टाईल याप्रमाणेच तो घालत असलेल्या जर्सी नंबरवरही अवलंबून असते. 
 विराट कोहली १८ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. पण त्यामागील खास गोष्ट काय हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


एका मुलाखती दरम्यान विराट कोहलीने १८ नंबरमागील कनेक्शन खुलं करून सांगितलं आहे. विराटचे जेव्हा अंडर १८ साठी भारतीय संघामध्ये निवड झाली तेव्हा त्याला १८ क्रमांकाची जर्सी देण्यात आली. त्यानंतर विराट कोहलीच्या वडिलांचे निधनही १८ डिसेंबरला झाले. हळूहळू विराटच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा १८ क्रमांकांशी संबंध आला. त्यामुळे कळत नकळत १८ क्रमांकाचा प्रभाव असल्यानेच हा क्रमांक कायम  जर्सीवर ठेवला असल्याचे विराटने सांगितले आहे. 


विराट कोहलीने १८ क्रमांकाची एक जर्सी अभिनेता आमिर खानलादेखिल दिली आहे. तेव्हा ही भेट खूपच असल्याची आणि ती कायम जपून ठेवेन असेदेखील आमिर म्हणाला होता.