विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंकेमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये तामिळनाडूचा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या सुंदरनं या मॅचमध्ये १० ओव्हर्समध्ये ६५ रन्स देऊन १ विकेट घेतली होती. सुंदरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये शिखर धवननं कॅच घेतला असता तर त्याच्या नावावर दोन विकेट झाल्या असत्या.


दुसऱ्या वनडेमध्ये मात्र वॉशिंग्टन सुंदरऐवजी चायनामन बॉलर कुलदीप यादवला संधी देण्यात आली. पदार्पणाच्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी प्रश्न विचारले पण भारतीय टीमच्या मीडिया मॅनेजरनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


वॉशिंग्टन सुंदरची तब्येत बरी नाही. त्यानं टीमच्या ट्रेनिंग सेशनमध्येही भाग घेतला नाही, म्हणून सुंदरऐवजी कुलदीपला संधी देण्यात आली, असं भारतीय टीमच्या मीडिया मॅनेजरनी सांगितलं.


ऑल राऊंडर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला केदार जाधव दुखापतग्रस्त झाल्यामुळे संधी मिळाली. मोहालीमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये सुंदरनं एक विकेट घेतली असली तरी त्याला बॅटिंगची संधी मात्र मिळाली नाही.