WI vs IND, 1st ODI : वेस्टइंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. विंडिजने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन निकोलस पूरनने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं क्वींस पार्क ओव्हल मैदानात आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवनकडे आहे. तर विंडिजची जबाबदारी निकोलस पूरनकडे आहे.(wi vs ind 1st odi west indies win toss elect to bowl 1st against team india)


शुबमन गिलचं कमबॅक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडिज विरुद्धच्या या वनडे सीरिजनिमित्ताने युवा ओपनर शुबमन गिलचं तब्बल दीड वर्षांनी  वर्षांनी संघात कमबॅक झालं आहे. गिलने अखेरचा एकदिवसीय सामना हा डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.


रवींद्र जाडेजा 'आऊट'


टीम इंडियाला या मालिकेच्या सुरुवातीलाच मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा  उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो विडिंज विरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयची मेडीकल टीम जडेजावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान जाडेजाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्या तिसऱ्या सामन्यात खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.  


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कॅप्टन), शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.  


विंडिज प्लेइंग इलेव्हन : निकोलस पूरन (कॅप्टन), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शमरह ब्रूक्स, काइल मेयर्स, रोवमॅन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि जेडन सील्स.