पोर्ट ऑफ स्पेन : इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केल्यानंतर टीम इंडिया विंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर रवीचंद्रन अश्विन आणि कॅप्टन शिखर धवन हे दोघे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.  मात्र विंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. (wi vs ind odi series team india star all rounder ravindra jadeja ruled out 1st 2 matches due to knee injurey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा पहिल्या 2 सामन्यातून आऊट झाला आहे. जडेजाला दुखापतीमुळे पहिल्या 2 सामन्यांना मुकावं लागणार आहे. जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याची माहिती दिली. 


जाडेजा बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग अशा तिन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करतो. मात्र जडेजा 2 सामन्यात खेळणार नसल्याने टीम इंडियाला मोठा फटका सहन करावा लागणार आहे.


जाडेजाच्या फिटनेसवर लक्ष


दरम्यान जाडेजाच्या दुखापतीवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. दरम्यान जाडेजा तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, हे त्याच्या दुखापतीवरच अवलंबून असेल, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलंय.


शुबमन गिलचं कमबॅक


विंडिज विरुद्धच्या या वनडे सीरिजनिमित्ताने युवा ओपनर शुबमन गिलचं तब्बल दीड वर्षांनी  वर्षांनी संघात कमबॅक झालं आहे. गिलने अखेरचा एकदिवसीय सामना हा डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन (कॅप्टन), शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.  


विंडिज प्लेइंग इलेव्हन : निकोलस पूरन (कॅप्टन), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शमरह ब्रूक्स, काइल मेयर्स, रोवमॅन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि जेडन सील्स.