Tagenarine Chanderpaul Double Century : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मालिकेला येत्या 9 फेब्रुवारी पासून सूरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजमध्ये  (West Indies vs zimbabwe) कसोटी सामने खेळवले जात आहे. या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ही डबल सेंच्युरी (Double Century)ठोकून त्याने आपल्याच वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. 


चंद्रपॉलची नाबाद डबल सेंच्यूरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वेविरूद्द बुलावायो कसोटीत शानदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ज्युनियर चंद्रपॉलने 467 चेंडूत नाबाद 207 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. त्याच्या या शानदार डबल सेंच्यूरी बळावर त्याने वेस्ट इंडिजचा पहिला डाव सम्मानजनक स्थितीत पोहोचवला आहे. 


 


हे ही वाचा : रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी 


 


वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक 


तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वे विरूद्ध डबल सेच्यूरी ठोकून वडिल शिवनारायण चंद्रपॉल यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. वडिल शिवनारायण चंद्रपॉलने 203 धावा करून डबल सेच्यूरी केली होती. ही डबल सेच्यूरी तेगनारायण 207 धावा करून मोडली आहे. तसेच तेगनारायण 2010 नंतर परदेशात डबल सेंच्यूरी ठोकणारा वेस्ट इंडिजचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. 


बाप-लेकाची डबल सेंच्यूरी ठोकणारी दुसरी जोडी 


वडिल शिवनारायण (shivnarine chanderpaul) नंतर तेगनारायणने डबल सेंच्यरी ठोकल्यानंतर, ते दोघे क्रिकेट वर्तुळातले डबल सेच्यूरी ठोकणारे बाप-लेकाची दुसरी जोडी ठरले आहेत. याआधी पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद आणि त्यांचा मुलगा शोएब मोहम्मद या बाप-लेकाच्या जोडीने डबल सेंच्यरी ठोकली होती. वडिलानंतर मुलाने डबल सेच्यूरी ठोकल्याचा हा पहिलाच विक्रम होता.  


वेस्ट इंडिजचा 447 धावांवर डाव घोषित 


तेगनारायणच्या (tegenarine chanderpaul) डबल सेंच्यूरीनंतर वेस्ट इंडिजने 6 विकेट्सवर 447 धावा करून डाव घोषित केला. तेगनारायणने पहिल्या डावात नाबाद 207 धावांची खेळी केली. तर कर्णधार क्रेग ब्रेथवेटने शानदार फलंदाजी करताना 182 धावा केल्या. काइल मेयर्स 20, रेमन रेफर 2, जर्मेन ब्लॅकवुड 5, रोस्टन चेस 7 आणि जेसन होल्डर 11 धावांवर बाद झाले. दुसरीकडे, झिम्बाब्वेकडून नवा गोलंदाज ब्रेंडन मावुता याने शानदार गोलंदाजी करताना प्रथमच 5 बळी घेतले.


दरम्यान आता झिम्बाब्वेचा पहिला डाव सुरु आहे. झिम्बाब्वे किती धावांपर्यंत मजल मारते हे पाहावे लागणार आहे.