नवी दिल्ली : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. वर्ल्ड कपनंतर एमएस धोनी निवृत्त होईल, असं बोललं जातंय. तसंच निवृत्तीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करेल, अशाही चर्चा सुरु आहेत. या सगळ्या चर्चांवर आता भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले नड्डा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी पक्षात प्रवेश करण्यासाठी भाजपच्या संपर्कात आहे का ? असा प्रश्न विचारल्यानंतर नड्डा म्हणाले की, 'आमचा पक्ष हा सर्वव्यापी आणि सर्मसमावेशी असा पक्ष आहे. आमच्या पक्षात कलाकार, खेळाडू, सांस्कृतिक जगतातले अनेक लोकं जोडले गेलेले आहेत. ही लोकं समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. भाजपचे  दार सगळ्यांसाठी उघडं आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. धोनीहा झारखंडची राजधानी रांचीचाच आहे.


निवृत्तीनंतरच निर्णय


धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी केला आहे. भाजप प्रवेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून माझी धोनीसोबत चर्चा सुरु आहे. दरम्यान पक्षप्रवेशाचा निर्णय हा धोनीच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतरच घेतला जाणार असल्याचे देखील पासवान म्हणाले.


'धोनी माझा मित्र'


धोनी माझा मित्र आहे. तो जागतिक पातळीचा खेळाडू आहे असे देखील पासवान म्हणाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह यांनी 'संपर्क फॉर समर्थन' अभियानातंर्गत धोनीची भेट घेतली होती. तेव्हापासून धोनी भाजप प्रवेश करणार असल्याचे चर्चांना पेव फुटायला सुरुवात झाली.