दिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार? इरफान पठाण आणि अंबाती रायडू भिडले; पाहा Video
Irfan Pathan vs Ambati Rayadu : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) दिनेश कार्तिकला संधी द्यावी की नाही? यावर बोलत असताना इरफाण पठाण आणि अंबाती रायडू यांच्या खडाजंगी पहायला मिळाली.
T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपची तयारी सुरू करणार आहे. टीम इंडिया 5 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यासाठी आता एप्रिलच्या अखेरपर्यंत टीम इंडिया (Team India Squad) जाहीर होणार आहे. अशातच आता टीम इंडियामध्ये कोणाची वर्णी लागणार? असा सवाल देखील विचारला जातोय. अशातच आता रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत या 8 खेळाडूंची नावं निश्चित झाल्याची माहिती मिळतीये. तर दिनेश कार्तिकला (Dinesh kartik) वर्ल्ड कप संधात घ्यावं की नाही? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशातच आता कार्तिकच्या स्कॉडमधील निवडीवरून इरफान पठाण आणि अंबाती रायडू (Irfan Pathan vs Ambati Rayadu) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे.
अंबाती रायडू काय म्हणाला?
मी दिनेश कार्तिकला लहानपणापासून पाहतोय. तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो धोनीच्या सावलीत वाढलाय. कदाचित त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली नाहीये. दिनेश कार्तिककडे नक्कीच एक संधी आहे, पुन्हा एकदा फिनिशिंग करायला आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करत टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देयला, असं अंबाती रायडू म्हणाला. त्यावर उत्तर देताना इरफान पठाणने देखील डीकेचं कौतूक केलं पण रायडूच्या वक्तव्यावर त्याने असहमती दर्शवली.
खरं पहायला गेलं तर दिनेश कार्तिकने अफलातून फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजीमध्ये कमाल दिसल होती. पूर्ण फॉर्ममध्ये दिनेश कार्तिक दिसतोय. मात्र, इंडिया टीमचं क्रिकेट वेगळं असतं. आयपीएलमध्ये खेळणं आणि वर्ल्ड कपच्या स्तरावर खेळणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नावाची गोष्ट नसते. तिथं तुम्हाला 12 नाही तर 11 खेळाडूच मिळतील खेळण्यासाठी, त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये नक्कीच प्रेशरची स्थिती असते, असं इरफाण पठाण म्हणतो. इरफाणच्या उत्तरावर अंबातीने त्याला रोखलं अन् 'तिथंही तुम्हाला कूकाबुरा बॉलने खेळावं लागणार आहे आणि हा खेळाडू सध्या पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे', असं अंबाती म्हणतो. त्यावर इरफाणने उत्तर दिलं.
पाहा Video
गोलंदाजीवर बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराह देखील फॉर्ममधील गोलंदाज आहे. इथं तुम्हाला कच्चे गोलंदाज देखील मिळतील आणि बुमराह सारखे पिकलेले गोलंदाज देखील मिळतील. जर धोनी नसेल तर आपण ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या खेळाडूंना का बघत नाही? जर पंत फॉर्ममध्ये नसेल तर विचार केला जाऊ शकत होता. मात्र, मला वाटतं की दिनेश कार्तिकच्या पुढं संजू सॅमसन आणि जितेश शर्मा आहे, असं इरफाण पठाण याने म्हटलं आहे.