Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची गेल्या काही महिन्यांपूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता धोनीने आयपीएल (Indian Premier League) खेळण्याचे संकेत दिले आहेत. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 वेळा विजेतेपदाला गवासणी घातली आहे. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच त्याच्या गुडघ्याची सर्जरी (knee surgery) झाली. त्यामुळे धोनी खेळण्याच्या आशा मावळल्या होत्या. अशातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत धोनीने सुचक वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी बंगळुरूमध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये (MS Dhoni Interview) माही सहभागी झाला होता. धोनीला बोलवण्यात आल्यावर मुलाखतकाराने धोनीची ओळख करू दिली. त्यावेळी मुलाखतकाराने धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा उल्लेख केला. त्यावेळी दुसर्‍या पॅनेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, अशी दुरूस्ती केली. धोनीने दुरुस्तीवर टाळ्या वाजवल्या. त्यानंतर मुलाखतीवेळी पुन्हा एका प्रश्नामध्ये... आता तू क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस, असं म्हणताच धोनी 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून...' असं म्हणाला. त्यामुळे धोनीने अद्याप आयपीएलमधून (IPL 2024) निवृत्ती घेतली नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 


माहीने यावेळी त्याच्या फिटनेसविषयी खुलासा केला. त्याचबरोबर धोनीने लोकांच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलंय. तुम्हाला माहितीये की, मला एक चांगला क्रिकेटर म्हणून लोकांनी मला ओळखावं, असं मला वाटत नाही. मी नेहमी म्हणतो, मला लोकांनी एक चांगला माणूस म्हणून ओळखावं, असं मला वाटतं. मला माहितीये की, चांगला माणूस होण्याची प्रोसेस मरेपर्यंत चालू असते, असं धोनी म्हणाला आहे. 




सीएसकेच्या पाचव्या आयपीएल चॅम्पियनशिपनंतर त्याच्या भविष्याविषयीच्या अटकळांना पूर्णविराम दिला होता. आयपीएल 2023 नंतर धोनीने 2024 च्या आयपीएलमध्ये परतण्याच्या त्याच्या इच्छेची पुष्टी केली होती. निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. धन्यवाद म्हणणे आणि निवृत्ती घेणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट आहे. परंतु चेन्नईच्या प्रेक्षकांना मला खास प्रेम दिलंय. त्यामुळे त्यांसाठी मी आणखी एक सिझन खेळण्याचा प्रयत्न करेल, असं धोनीने म्हटलं होतं.