Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्यावेळी रोहित शर्माने कळीच्या मुद्द्याला हात घातला अन् थेट आश्विनच्या प्लेईंग कंडिशनवर वक्तव्य केलंय. नेमकं कॅप्टन रोहित शर्माने आश्विनबाबत (Ravichandran Ashwin) कोणती भूमिका घेतलीये? पाहुया....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्विनकडे कोणत्याही परिस्थितीत उत्तम क्रिकेट खेळतो. त्याने तशी मेहनत घेतली आहे. त्याला प्रेशर चांगल्या प्रकारे हाताळता येतं. तो गेल्या वर्षभरात वनडे क्रिकेट खेळला नाही म्हणून त्याची गुणवत्ता कोणीही झाकू शकत नाही, असं रोहित शर्मा (Rohit Sharma on Ravichandran Ashwin) म्हणाला आहे.


गेल्या काही सामन्यांमध्ये, आश्विनने किती चांगली गोलंदाजी केली हे आम्ही पाहिलंय. त्याच्या स्लीव्हजमध्ये बरंच वैविध्य आहे आणि जर संधी असेल तर आपण बर्‍याच गोष्टी पाहू शकतो. या क्षणी ज्याप्रकारे गोष्टी चांगल्या होत आहेत, ते आमच्यासाठी चांगलं आहे कारण आमच्याकडे सर्व बॅकअप तयार आहेत, असं रोहित शर्मा म्हणालाय.


आणखी वाचा - श्रीलंकेचा मास्टरस्ट्रोक! भारताला नेस्तनाबूत करणाऱ्या मिस्ट्री स्पिनरची वर्ल्ड कपमध्ये थेट एन्ट्री


टीम इंडियाचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axer Patel) सध्या फॉर्ममध्ये नसल्याची चर्चा आहे. आशिया कपमध्ये अक्षरला चांगली गोलंदाजी करता आली नाही. मात्र, त्याने बॅटिंगमध्ये जोर दाखवून दिलाय. तर दुसरीकडे आश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कडाकडा विकेट्स मोडत कांगारूंना जमिनीवर आणलं. त्यामुळे आता आश्विन वर्ल्ड कप खेळणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रोहित शर्माने आता आश्विनच्या फॅन्सच्या निराश केल्याचं दिसून येतंय.


पाहा Video



दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची फायनल यादी (Indian Team squad for ODI World Cup 2023) जाहीर केली गेली नाही. येत्या 28 तारखेपर्यंत फायनल यादी जाहीर संधी आहे. श्रीलंका आणि बांगलादेश संघाने अंतिम यादी जाहीर केलीये. तर आता टीम इंडियाच्या अंतिम यादीत कोण असणार? कोणाला संधी मिळणार अन् कोणाला डच्चू? असा सवाल आता विचारला जात आहे.