Rohit Sharma: रोहित शर्माचा हट्ट पडणार महागात? राजकोटमध्ये हिटमॅनने करू नये `ही` चूक
Rohit Sharma: रोहित शर्माचा हट्टीपणा टीम इंडियासाठी महागात पडू शकतो. दरम्यान रोहित शर्माचा असा कोणता निर्णय आहे, जो तिसऱ्या टेस्टसाठी बदलावा लागण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने या पराभवाचा बदला घेतला. तिसरा टेस्ट सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यात रोहित शर्माचा हट्टीपणा टीम इंडियासाठी महागात पडू शकतो. दरम्यान रोहित शर्माचा असा कोणता निर्णय आहे, जो तिसऱ्या टेस्टसाठी बदलावा लागण्याची शक्यता आहे.
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. दुसऱ्या टेस्ट सामनयात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली कामगिरी केली पण तिसऱ्या टेस्टमध्ये गोलंदाजीवर आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्तम कामगिरी केली आणि 9 विकेट्स पटकावल्या.
विशाखापट्टणममध्ये रोहित शर्माने केली 'ही' चूक
इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्यो स्पिनर गोलंदाचांचं वर्चस्व अपेक्षित होतं, मात्र तसं घडताना दिसलं नाही. पहिल्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये तसं होऊ शकलं नाही. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे इंग्लिश फलंदाजांना त्यांच्या जाळ्यात अडकू शकले नाहीत. परंतु भविष्यातही त्यांच्याकडून अपेक्षा असतील आणि ते ही कामगिरी करतील अशी शक्यता आहे. मात्र जसप्रीत बुमराहसाठी दुसरा पार्टनर गोलंदाज टीमसाठी धोकादायक ठरताना दिसतोय.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटीत बुमराहसह मोहम्मद सिराजला दुसरा गोलंदाज म्हणून मैदानात उतरवलं होतं. सिराजने त्या टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये केवळ 11 ओव्हर्स फेकल्या आणि 50 रन्स दिले. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. या अपयशानंतरही टीम इंडियाने पुढच्या टेस्टमध्ये त्याच्या जागी मुकेश कुमारचा समावेश केला. मुकेशलाही या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने दोन्ही डावात 12 ओव्हर्समध्ये एकूण 70 रन्स दिले आणि एक विकेट घेतली.
इंग्लंडने दोन्ही टेस्टमध्ये केवळ 1-1 वेगवान गोलंदाजांचा वापर केला. टीम इंडियाने पहिल्या टेस्टमध्ये दोन वेगवान गोलंदाजांसह जाणं समजण्यासारखं होतं. याचं कारण तीन स्पिनर्सवर अधिक विश्वास होता. पण हा प्लॅन अपयशी ठरल्यानंतरही पुढच्या टेस्टमध्ये दुसऱ्या फास्ट गोलंदाजासोबत जाण्याचा रोहितचा निर्णय पटण्याजोगा नव्हता. या दोन सामन्यांनंतर आता कर्णधार रोहित राजकोटमध्ये ही चूक करणार नाही, अशी अपेक्षा आहे.