मुंबई : स्वित्झर्लंडचा खेळाडू आणि विम्बल्डनवर अधिपत्य सांगणाऱ्या रॉजर फेडरर याला नमवत सर्वियाच्या नोवाक जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन पुरुष एकेरीचं जेतेपट मिळवलं आहे. रविवारी सेंटर कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात या दोन्ही खेळाडूंमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचं पाहायला मिळालं. जोकोविचने पाचव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरलं असून, या निमित्ताने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास चार तास आणि ५५ मिनिटांपर्यंत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या स्थानारील रॉजर फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.  



जोकोविच आणि फेडरर या दोघांमध्येही खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या सुरेख खेळाची झलक पाहायला गेली. आतापर्यंतच्या इतिहासात पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत खेळला गेलेला हा सर्वाधिक वेळ चाललेला सामना होता.



नोवाकने या जेतेपदासह आमखी एका विक्रमाला गवसणी घातली. लहानपणापासूनच टेनिस खेळू लागल्यापासून विम्बल्डनचं जेतेपद मिळवणं हे माझं स्वप्न होतं. यावेळी त्याने पालकांचे आणि संपूर्ण कुटुंबाचेच मनापासून आभार मानले. 



वयाच्या ३७ व्या वर्षी पराभव स्वीकारावाल लागला म्हणजे सारंकाही संपलं असं नाही, असं म्हणत फेडररची सकारात्मक वृत्ती पुन्हा सर्वांनाच पाहायला मिळाली. यावेळी पराभवाचं दु:ख असल्याचं म्हणणाऱ्या फेडररने पुन्हा त्याच उत्साहात पुनरागमन करण्याची हमीची क्रीडारसिकांना दिली. शिवाय कुटुंबाचे मनापासून आभारही मानले. अतिशय उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सामन्याला ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विलियम आणि डचेस ऑफ केम्ब्रिज कॅथरीन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. यालाच काही माजी टेनिस खेळाडूंचीही जोड मिळाली होती.