`...अजिबात सेक्स करायचा नाही`, Wimbledon चा टेनिस चाहत्यांना आदेश; पण असं झालं तरी काय?
विम्बल्डनने (Wimbledon) टेनिस चाहत्यांना इशारा दिला आहे. मैदानातील शांतता खोलीचा (quiet room) वापर हा फक्त प्रार्थना आणि ध्यानासाठी करायची आहे. जोडप्यांनी सेक्स करण्यासाठी त्याचा वापर करु नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
विम्बल्डनने (Wimbledon) टेनिस चाहत्यांना इशारा दिला आहे. मैदानातील शांतता खोलीचा (quiet room) वापर हा फक्त प्रार्थना आणि ध्यानासाठी करायची आहे. जोडप्यांनी सेक्स करण्यासाठी त्याचा वापर करु नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, गतवर्षी अनेक जोडप्यांनी कोर्ट 12 जवळील निर्जन जागेचा वापर मजा मारण्यासाठी केली होती. यामुळे इतर प्रेक्षकांना वाईट अनुभव आले होते. त्यांना काही भयानक गोष्टी पाहाव्या लागल्या होत्या.
ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅली बोल्टन यांनी, "लोक शांतता खोलीचा वापर योग्य कारणासाठी करतील हे आम्ही सुनिश्चित करत आहोत" अशी माहिती दिली आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, "जर लोकांना प्रार्थनेसाठी जागा हवी असेल तर त्यासाठी शांतता खोली आहे. त्याठिकाणी महिला स्तनपानही करु शकतात. त्या खोलीचा योग्य वापर होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत".
2022 मध्ये एका प्रेक्षकाने एका जोडप्याला कोर्ट 12 च्या शेजारी असणाऱ्या ठिकाणी एका जोडप्याला पाहिलं होतं. एका साक्षीदाराने सांगितलं होतं की, दोघे खोलीतून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर मोठं हास्य होतं. महिलेने उन्हाळी पोषाख घातला होता. ते काय करत होते याचा अंदाज त्यांच्याकडे पाहून येत होता असं वृत्त 'द गार्डियन'ने दिलं होतं.
दरम्यान एका व्यक्तीने जोडप्याचे आवाज ऐकले होते. त्यावेळी विम्बल्डनने प्रेक्षकांना त्या जागेचा आदर करा अशी विनंती केली होती. प्रार्थना, ध्यान, स्तनपान किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी ही खोली वापरा अशी सूचना त्यांनी केली होती.
ही सुविधा दक्षिणेच्या दिशेला आहे. शांतता खोली ही एक अशी जागा आहे जिथे पाहुणे काही वेळासाठी ध्यान, प्रार्थना किंवा चिंतनासाठी जाऊ शकतात. तसंच अनेकदा गर्दीपासून दूर जाण्यासाठीही या खोलीचा वापर केला जातो. 2023 च्या अधिकृत प्रवेश मार्गदर्शिकेत याची माहिती देण्यात आली आहे. खोलीत दोन आरामखुर्च्या, एक फोल्डवे टेबल आणि चार्जिंग सुविधा आहे.