विम्बल्डन : विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स आणि स्पेनची गॅर्बीन मुगुरुझा यांच्यात शनिवारी रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपांत्य लढतीत विम्बल्डन चषक पाच वेळा पटकावलेल्या व्हीनस विल्यम्सनं, ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोहाना कोंटाच्या पराभवाबरोबरच विम्बल्डन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात ब्रिटिश महिला खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं ब्रिटनवासीयांचं स्वप्न भंगलं गेलं. 


दुसरीकडे स्पेनच्या गार्बिन मुगुरुझा हिचा स्लोवाकीयाच्या मॅग्डालेना रीबारीकोवा हिच्या विरोधातला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा एकतर्फी असाच झाला. मुगुरुझानं रीबारीकोवाला 6-1, 6-1 अशा फरकानं अगदी सहजपणे मात दिली. कोर्टवर कमालीच्या आश्वासकतेनं वावरणा-या मुगुरुझानं, अवघ्या 64 मिनिटांतच रीबारीकोवाला पराभूत केलं. 


तब्बल 9 वर्षांनंतर विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना व्हीनस विल्यम्स शनिवारी खेळेल. त्याचवेळी मुगुरुझा हिचा विम्बल्डन स्पर्धेतला हा दुसरा अंतिम सामना असेल.