पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर महिलेचा शारीरिक शोषण केल्याचा आरोप
बाबर आझमवर लग्नाचे आश्वासन देत 10 वर्ष शारीरिक शोषणाचा आरोप
कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. आरोप करणार्या महिलेच्या म्हणण्यानुसार, बाबर आझमने तिला लग्नाचे आश्वासन देत 10 वर्ष तिचे शारीरिक शोषण केले. शनिवारी एका पत्रकार परिषदेत महिलेने हे आरोप केलेत. अतिशय कठीण काळात बाबर आझमला साथ दिली आणि आर्थिक मदतही केली. असं देखील या महिलेने म्हटल आहे.
महिलेने म्हटलं की, 'दोघेही शाळेतले मित्र आहेत आणि बाबर आझमने 2010 मध्ये तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोललो आणि जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा बाबरने मला घरातून पळून नेते आणि भाड्याच्या घरातदेखील ठेवले. २०१२ मध्ये बाबर आझमने अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांची राष्ट्रीय संघात निवड झाली आणि त्यानंतर त्यांची मानसिकता बदलली.' टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी बाबर आझम सध्या न्यूझीलंडच्या दौर्यावर आहेत.
पोलिसांकडे जाण्यापूर्वी बाबरने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. बाबर आझमवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. बाबरचे अनेक खर्च तिने केल्याचा देखील या महिलेने सांगितले. आता पाकिस्तानी कर्णधारावर आरोप लावल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यावर कोणती कारवाई करेल हे पाहावं लागेल.
नुकतीच बाबर आझमला पाकिस्तान क्रिकेट संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंडमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. दोन्ही देशांमध्ये 18 डिसेंबरपासून सामने होणार आहेत. याआधी सात पाकिस्तानी खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.