मुंबई : महिला आशिया कप 2022 मध्ये (w asia cup t20 2022) वूमन्स टीम इंडियाला (Team India) पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट टीमने (Pakistan)टीम इंडियावर 13 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी टीम इंडियाने खेळलेल्या 3 सामन्यात विजय मिळवला होता. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे भारताला पराभूत व्हाव लागलं आहे. (womens asia cup t20 2022 pakistan beat team india by 13 runs at sylhet international cricket stadium)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाचा डाव 19.4 ओव्हरमध्ये 124 धावांवरच आटोपला. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी पाचारण केलं. टीम इंडियाकडून रिचा घोषने सर्वाधिक 26 धावा केल्या. तर हेमलथाने 20 रन्सचं योगदान दिलं. काही अपवाद वगळता इतर फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. पाकिस्तानकडून नशरा संधूने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.  निदा दार आणि सादिया इक्बाल या दोघींनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 


पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन :  मुनीबा अली, सिदरा अमीन, बिस्माह मारूफ, निदा डार, आयेशा नसीम, अलिया रियाज, ओमैमा सोहेल, ऐमन अनवर, सादिया इकबाल, तुबा हसन आणि नशरा संधु. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृति मंधाना, एस मेघना, जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर, डी हेमलता, ऋचा घोष, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका सिंह आणि राजेश्वरी गायकवाड.