वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला बदला घेणार?; पाकिस्तानला इतक्या धावांचं आव्हान
टीम इंडियाने पाकिस्तानला 245 रन्सचं आव्हान दिलं आहे.
न्यूझीलंड : आयसीसी महिला वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगला आहे. भारतीय कर्णधार मिताली राज हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार टीम इंडियाने पाकिस्तानला 245 रन्सचं आव्हान दिलं आहे.
भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृति मंधाना ही जोडी ओपनिंगला उतरली होती. मात्र फलंदाजी करताना महिलांच्या टीम इंडियाची सुरुवात काही खास झाली नाही. शेफाली वर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. शेफाली अवघ्या 4 रन्सवर आऊट झाली.
यानंतर दिप्ती शर्मा आणि स्मृति मंधाना या दोघींनी डाव सांभाळला. दोघींमध्येही 50 पेक्षा अधिक रन्सची पार्टरनरशिप झाली. भारताची कर्णधार मिताली राज, हरमनप्रित कौर यांना साजेसा खेळ करता आला नाही.
तीन जणींनी झळकावलं अर्धशतक
टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना स्मृतीने डाव सांभाळला. स्मृतीने 75 बॉलमध्ये 52 रन्स करत टीमला चांगला स्कोर उभारण्यात मदत केली. यानंतर पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी टीम इंडियाच्या डावाची कमान सांभाळली. दोघींनीही उत्तम अर्धशतकं झळकवत स्कोर 200 पार नेला.