Women’s T20 World Cup 2023: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे. जेमिमा रोड्रिग्सने टीम इंडियासाठी हा विजय खेचून आणला. जेमिमाने शानदार हाफ सेंच्युरी झळकावत 53 रन्सची खेळी केली आहे.


जेमिमा रोड्रिग्स विजयाची खरी शिल्पकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून जेमिमा रोड्रिग्सने सर्वाधिक 53 रन्स केले. तर शेफाली वर्माने 25 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी केली. याशिवाय रिचा घोषनेही 31 रन्स करत जेमिमाच्या मदतीने पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.


टीम इंडियाला 150 रन्सचं आव्हान


पाकिस्तानच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची सुरुवात फारशी चांगली होऊ दिली नाही. मात्र पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिने अर्धशतक झळकावत पाकिस्तान टीमचा स्कोर 4 विकेट्स 149 पर्यंत नेला. यामध्ये बिस्माहला आयेशा नसीमने चांगली साथ दिली. टीम इंडियाकडून राधा यादवने 2 तर दिप्ती शर्मा आणि पुजा वस्त्राकरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.


IND W vs PAK W: टीम इंडियाची प्लेइंग 11


शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका ठाकुर सिंह


IND W vs PAK W: पाकिस्तानची प्लेइंग 11


झवेरिया खान, मुनिबा अली (विकेटकीपर), बिस्माह मारूफ (कर्णधार), निंदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, ​​फातिमा सना, अमीन अनवर, नशर संधू, सलीह इकबा