लिसेस्टर :  महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताने चार पैकी चार सामने जिंकून आपल्या विजयाची मालिका कायम ठेवली आहे.  आता भारताचा पाचवा सामना दक्षिण आफ्रिकेशी शनिवारी होणार आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 


कर्णधार मिथाली राजच्या विक्रमाकडे लक्ष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा हा वर्ल्ड कपमधील सामना महत्त्वाचा असला तरी या सामन्यात भारताची कर्णधार मिथाली राज हिच्या विक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी मिथालीला फक्त ३४ धावा बाकी आहेत. 


सध्या ५९९२ धावांसह  इंग्लंडची कारलोट एडवर्ड्स प्रथम क्रमांकावर  आहे. एडवर्ड्सने हा विक्रम १९१ सामने खेळत केला आहे.  मिथालीने हा विक्रम केला तर सर्वाधिक विकेट घेणारी जुलन गोस्वामी आणि सर्वाधिक धावा काढणारी मिथाली अशा दोन्ही भारतीय खेळाडू होणार आहेत. 


मिथालीने आतापर्यंत १८१ सामन्यात १६२ इनिंग खेळत ४२ वेळा नाबाद राहत ५९५९ धावा काढल्या आहेत. यात ४८ अर्धशतकं आणि पाच शतके झळकावली आहेत. तीने ५१.८१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिची वन डेमधील सर्वाधिक धावसंख्या ११४ आहे.