मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारा खेळाडू बी साई प्रणित लवकरच श्वेता जयंतीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. शुक्रवारी अगदी खासगी पद्धतीने यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक बॅडमिंटन खेळाडू उपस्थित होते. यामध्ये सायना नेहवाल आणि परूपल्ली कश्यप देखील उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साई प्रणितकरता हे वर्ष अतिशय खास असणार आहे. 36 वर्षानंतर भारताने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल आहे. 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांच्यानंतर तब्बल 36 वर्षांनी पुरूष एकेरी खेळाडू स्पर्धेत साईने पदक जिंकलं आहे. 


त्याचप्रमाणे प्रणित जागतिक बॅडमिंटन खेळाडू स्पर्धेच्या रॅंकमध्ये 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. साई 2020 मध्ये होणाऱ्या टोकयो ऑल्मिपिकमध्ये खेळणार आहे. तसेच या वर्षी म्हणजे 2019 मध्ये प्रणितला अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. करिअरमध्ये यंदाचं वर्ष महत्वाचं ठरल्यानंतर साईने यावर्षी आपल्या खासगी आयुष्यातही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी प्रणितचा साखरपुडा झाला आहे. 



या कार्यक्रमाला सायना, कश्यप, अश्विनी पोन्नाप्पा, चिराग शेट्टी, प्रणव जेरी चोप्रा, एच एस प्रॅनॉय, गुरूसाई दत्त यासांरख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सायना नेहवालने या सोहळ्याचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 



तसेच अश्विनी पोन्नाप्पाद्वारे 4 सेकंदाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ साईचा आनंदी चेहरा पाहू शकतो.