लीड्स : एंजलो मॅथ्यूजचं शतक लहिरु थिरमानेच्या अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेला सावरलं आहे. श्रीलंकेने ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २६४ रन केल्या. ५५ रनवर श्रीलंकेने त्यांच्या ४ विकेट गमावल्या होत्या, पण मॅथ्यूज आणि थिरमानेने १२४ रनची पार्टनरशीप केली. मॅथ्यूजने १२८ बॉलमध्ये ११३ रन केले, तर थिरमानेला ६८ बॉलमध्ये ५३ रन करता आले. मॅथ्यूजचं हे वनडे क्रिकेटमधलं तिसरं शतक होतं. मुख्य म्हणजे मॅथ्यूजने वनडे क्रिकेटमधली त्याची तिन्ही शतकं भारताविरुद्ध केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये बुमराहने श्रीलंकेला पहिलाच धक्का दिमुथ करुणारत्नेच्या रुपात दिला. बुमराहची वनडे क्रिकेटमधली ही १००वी विकेट होती. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


या मॅचमध्ये टीम इंडियाने २ बदल केले. मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली. या दोघांच्याऐवजी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश झाला.


वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने आधीच प्रवेश केला आहे. तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा